महा-ई सेवा केंद्रातील आॅपरेटरचा प्रश्न गंभीर

By Admin | Updated: September 24, 2014 00:42 IST2014-09-24T00:39:34+5:302014-09-24T00:42:13+5:30

जालना : बदनापूर तालुक्यातील हिवरा, रोषणगाव, खामगाव येथे ६० ते ७० ई सेवा केंद्र कोणतीही सूचना न देण्यात आल्याने बंद करण्यात आले आहेत.

Maha-e-Service Center's operator's query is serious | महा-ई सेवा केंद्रातील आॅपरेटरचा प्रश्न गंभीर

महा-ई सेवा केंद्रातील आॅपरेटरचा प्रश्न गंभीर

जालना : बदनापूर तालुक्यातील हिवरा, रोषणगाव, खामगाव येथे ६० ते ७० ई सेवा केंद्र कोणतीही सूचना न देण्यात आल्याने बंद करण्यात आले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील आॅपरेटर बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. याचा विचार करत शासनाने ग्रामीण भागात महा ई सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाममात्र वेतनावर कॉम्प्युटर आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आली. परंतु काहीही कारण नसताना ही केंद्रे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहेत. आॅपरेटरवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा गंभीर प्रश्न आॅपरेटर समोर उभा राहिला आहे. आमच्याकडून आगाऊ पैसे घेवून दुसरीकडे ही केंद्रे हस्तांतरित करण्याचा डाव काही अधिकारी आखत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. वारंवार पैशाच्या आकड्यात बदल करून आमची पिळवणूक करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महा ई सेवा केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतीत अनेक तक्रारी करून देखील अद्यापही न्याय मिळालेला नाही. केंद्रे बंद झाल्याने ग्रामीण भागातील जनेतलाही विविध कागदपत्रांसाठी तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी खेटे मारावे लागत आहेत. जिल्ह्यातील केंद्रातील त्रुटी सांगव्यात ,आम्ही त्या दुरुस्त करु, अशी विनंतीही निवेदनकर्त्यांनी केली आहे. बहुतांश आॅपरेटर्सनी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी जालना यांना निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.समस्या निकाली काढण्याची मागणी केली. या निवेदनावर श्रीमंत किशन बरडे, अर्जुन जगन्नाथ उबाळे यांच्यासह इतर केंद्रचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Maha-e-Service Center's operator's query is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.