शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोचे बजेट सर्वेक्षणातून तयार होणार

By admin | Updated: September 2, 2014 01:54 IST

परभणी: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे लेबर बजेट राज्यातील १३८ तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून तयार करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा समावेश आहे.

परभणी: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे लेबर बजेट राज्यातील १३८ तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून तयार करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील ८ तालुक्यांचा समावेश आहे. राज्यात यशस्वी ठरलेली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना केंद्राने ती महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या नावाने देशभर लागू केली आहे. या योजनेनुसार प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळावा, या उद्देशाने शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहे. या योजनेवर काम करणाऱ्या मजुरांचे योग्य ते बजेट तयार व्हावे, यासाठी केंद्र शासनाने सर्व घटकांना सामावून घेऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १३८ तालुक्यांमध्ये २०१४-१५ चे लेबर बजेट करण्यात येणार आहे. ग्रामपंचयातीमार्फत तयार करण्यात येणाऱ्या या बजेटमध्ये जिल्ह्यातील परभणी वगळता उर्वरित आठही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे बजेट तयार करण्यात येत असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, स्त्रीकर्ता असलेली कुटुंब, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवासचे लाभार्थी, अनुसूचित जमाती व पारंपारिक वनवासी (वनहक्क मान्य करणे अधिनियम २००६, २००७ चे लाभार्थी) तसेच कृषीकर्ज माफी, कर्जसहाय्य योजना आदी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून माहिती घेतली जाणार आहे. यावेळी त्यांच्याकडून कामाच्या मागणीसंदर्भातील सर्वेक्षण करण्यात येणार असून कशा प्रकारे सर्वेक्षण करायचे, याबाबतही माहिती प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आली आहे. या सोबतच संबंधित कुटुंबातील एका व्यक्तीकडे जॉबकार्ड असणे आवश्यक करण्यात आले असून त्यांच्याकडील आधारक्रमांकाची माहितीही यावेळी जमा केली जाणार आहे. सर्व्हेक्षणाची ही माहिती एकत्रित केल्यानंतर २०१५-१६ चे लेबर बजेट तयार करुन त्यानुसार निधी वितरित केला जाणार आहे.