सोनपेठ, पाथरीत भव्य रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:07 IST2017-08-06T00:07:59+5:302017-08-06T00:07:59+5:30
मुंंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी सोनपेठ शहरातून ५ आॅगस्ट रोजी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होेते.

सोनपेठ, पाथरीत भव्य रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : मुंंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी सोनपेठ शहरातून ५ आॅगस्ट रोजी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होेते.
९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे मराठा समाजबांधवांच्या वतीने आपल्या न्याय मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, यासाठी जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सोनपेठ शहरातही शनिवारी भव्य दुचाकी रॅलीेचे आयोजन केले होेते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाजबांधव सकाळपासूनच जमा झाले.
सकाळी ११ वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई इंगोले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दुचाकी रॅलीस सुुरुवात झाली. शहरातील शहीद मुंजाभाऊ तेलभरे चौक, आंबेडकर चौक, सांस्कृतिक सभागृह, दहिखेड, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे रॅलीचा समारोप बाजार समिती परिसरामध्ये झाला.
यामध्ये जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, लाखा मराठा आदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. अत्यंत शिस्तप्रिय व शांततेत रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.