दंडाधिकारीय चौकशी
By Admin | Updated: February 4, 2017 23:49 IST2017-02-04T23:44:24+5:302017-02-04T23:49:11+5:30
उस्मानाबाद : महिला बंदी शीतल हिप्परगे हिची मुलगी समीक्षा हिचा शासकीय रुग्णालयात २२ जुलै २०१४ रोजी मृत्यू झाला होता़

दंडाधिकारीय चौकशी
उस्मानाबाद : जिल्हा कारागृहातील महिला बंदी शीतल उर्फ ताई सिद्धेश्वर हिप्परगे हिची मुलगी समीक्षा सिद्धेश्वर हिप्परगे (वय-२, रा. येणेगूर, ता. उमरगा) हिचा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार चालू असताना २२ जुलै २०१४ रोजी मृत्यू झाला होता़ या प्रकरणाची फौजदारी प्रक्रिया संहितामधील तरतुदीनुसार चौकशी करण्यासाठी उस्मानाबादेतील उपविभागीय दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे़
समिक्षा हिप्परगे या मयत मुलीच्या नातेवाईकास त्यांचे मृत्यूबाबत काही म्हणणे किंवा काही माहिती असेल तर त्यांनी त्यांचे सबळ पुराव्यासह ९ फेब्रुवारी रोजी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे पुराव्यानिशी दाखल करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने चेतन गिरासे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)