‘मग्रारोहयो’ बारगळली

By Admin | Updated: June 25, 2014 00:38 IST2014-06-25T00:24:03+5:302014-06-25T00:38:22+5:30

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यात मग्रारोहयो योजनेअंतर्गत मजुरांना रोजगार मिळावा यासाठी शेकडो कामे करण्यात येवून मजुरीही अदा करण्यात आली

'Maghorohio' recovers | ‘मग्रारोहयो’ बारगळली

‘मग्रारोहयो’ बारगळली

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यात मग्रारोहयो योजनेअंतर्गत मजुरांना रोजगार मिळावा यासाठी शेकडो कामे करण्यात येवून मजुरीही अदा करण्यात आली, मात्र गेल्या तीन वर्षापासून साहित्य खरेदीचे ३ कोटी रुपये थकविण्यात आल्याने तालुक्यातील सरपंच व जबाबदार पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत.
माहूर तालुक्यात शेतकरी व व्यापाऱ्यांची संख्या कमी तर मजुरांची संख्या जास्त असल्याने माहूर तालुक्यात २९० हजारांवर मजुरांची नोंद झाली आहे. तसेच नोंदीत बांधकाम मजुरांची संख्या २० हजारापेक्षा जास्त असूनही एकाही नोंदीत बांधकाम कामगारास शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मग्रारोहयो योजनेत २० हजारांवर मजुरांची नोंद होवूनही फक्त यावर्षी ३७०० मजुरांना काही दिवस काम देण्यात आले तर ईतर मजुरांना कामे देण्यात न आल्याने या मजुरांनी कामासाठी स्थलांतर केले आहे. सध्या माहूर तालुक्यातील ११७२ मजुरांना कामे देण्यात आली असून यामध्ये आसोली-१९६, रुपानाईक तांडा- १०१ भोरड-६२, मेंडकी-१३, पापलवाडी -२०६, कुपटी-६७, दत्त मांजरी -१४, तांदळा-७२ , रुई-२७, गोकुळ गोंडेगाव- ६७, वाईबाजार- ११६, अंजनखेड- ४६, आष्टा- ७० ही कामे ग्रामपंचायती मार्फत १०५७ मजुरांना देण्यात आली. कृषी विभगाकडून वानोळा येथे एका कामावर ३८ मजुरांना कामे देण्यात आली असून सामाजिक वनीकरण विभागाकडून वाई बाजार येथे ६५ पडसा येथे व रस्त्यावर झाडे लावून संगोपनासाठी १२७ मजुरांना कामे देण्यात आली आहेत. एकूण ११७२ मजूर सध्या कामावर असून पाऊस पडल्यास या सर्व मजुरांना कामे देणे बंद करण्यात येते. पावसाळ्यात सर्व मजुरांना कामे मिळतात हा या मागचा समज असल्याने हजारो मजुरांवर शेतात काम करणारे ट्रॅक्टर्स व इतर मशिनरीज उपासमारीची पाळी आणणार आहेत.
सन २०१३-१४ च्या मजुरी अदायगीच्या अहवालात ६० टक्के खर्च मजुरांवर तर ४० टक्के खर्च साहित्यावर करावा असा शासनाचा आदेश असल्याने जिल्ह्यातील ईतर तालुक्यात मजुरांची ५० टक्के रक्कम व साहित्याची ५० टक्के रक्कम देण्यात आली असून माहूर तालुक्यात चित्र उलटे आहे. मजुरी पोटी ११६.३८ (९७.४२) टक्के देण्यात आले तर साहित्यापोटी ३.०८ देण्यात आले. याची टक्केवारी फक्त (२.५८) टक्के आहे. पदाधिकारी मजुराना जनजागरणाद्वारे कामे सुरू करावयास लावायची प्रसिद्धी मिळवायची व मजुरी व साहित्याच्या रक्कमेसाठी चकरा मारावयास लावायच्या यामुळे पदरमोड करुन पूर्ण करण्यात आलेल्या कामावरील खर्च निघत नसल्याने सरपंच व ईतर संबंधित व्यक्ती येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत. (वार्ताहर)
११७२ मजुरांची उपस्थिती
रुग्णालतालुक्यात ११७२ मजुरांनी उपस्थिती माहूर तालुक्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कार्यालयातील संगणकात असतात. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असून याच्या विपरीत परिस्थिती जिल्हाधिकार्यालयातून देण्यात येत आहे. साप्ताहिक अहवालात एकूण मजूर उपस्थितीच्या ठिकाणी एकूण मनुष्य दिनाचा अहवाल मजूर उपस्थितीच्या रकान्यात टाकला जात असून तालुक्याच्या अहवालात मजूर उपस्थिती ११७२ तर जिल्ह्याच्या अहवालात मजूर उपस्थिती ७०३२ ईतकी दाखवून बोळवन केली जात आहे. प्रत्यक्षात सदर योजना अधिकारी वर्ग बारगळवून मजुराना उपासमारी व भुकबळीच्या खाईत लोटण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.

Web Title: 'Maghorohio' recovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.