हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओपदी मधुकरराजे आर्दड
By Admin | Updated: January 14, 2015 00:53 IST2015-01-14T00:51:52+5:302015-01-14T00:53:50+5:30
हिंगोली : मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारीपदावर असलेले मधुकरराजे आर्दड यांची हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओपदी मधुकरराजे आर्दड
हिंगोली : मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारीपदावर असलेले मधुकरराजे आर्दड यांची हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.
आर्दड यांनी यापूर्वी नांदेड येथे उपजिल्हाधिकारी, जालना येथे निवडणूक अधिकारी, औरंगाबाद येथे जिल्हापुरवठा अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त, सोलापूर येथे अप्पर जिल्हाधिकारी, मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिेते पाटील यांचे सचिव, तसेच मुंबई येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उपमुख्यकार्यकारी अधिकारी आदी पदांवर काम केले आहे़ आर्दड हे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील रहिवासी आहेत़ (जिल्हा प्रतिनिधी)