सौर ऊर्जेवर चालणारी बनविली सायकल..!
By Admin | Updated: March 31, 2016 00:29 IST2016-03-31T00:17:02+5:302016-03-31T00:29:45+5:30
लातूर : विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे. १०० किलो वजन घेऊन

सौर ऊर्जेवर चालणारी बनविली सायकल..!
लातूर : विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे. १०० किलो वजन घेऊन तासी ३० कि.मी. धावणारी ही सौर ऊर्जेवरील सायकल आलमला पंचक्रोशीत कौतुकाची ठरली आहे.
विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सोलार सायकलमध्ये डीसी मोटार, सोलार पॅनल, बॅटरी, कन्ट्रोलर आदी उपकरणांचा समावेश करून ही सायकल तयार केली आहे. फूटपेडल ही डीसी मोटार व बॅटरीशी जोडलेली आहे. जे की वेग वाढविण्यास मदत होते. तथापि, पेडल वापरण्याची गरज पडत नाही. सोलार पॅनल हे सौर ऊर्जावरती विद्युत निर्मिती करते. ही विद्युत ऊर्जा बॅटरीमध्ये संकलित केले जाते.
या विद्युत ऊर्जेवर मोटार हेडलाईट कार्यान्वित होते. या सायकलचा तासी वेग ३० कि.मी. असून, १०० किलो वजन वाहू शकते. यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मंगेश बिडवे, प्रा.के.एस. जाधव, ए.एम. मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षातील विद्यार्थी दीपक पाटील, करण पंडगे, हणमंत चाफे, रामकृष्ण साळुंके या विद्यार्थ्यांनी ही सायकल बनविली आहे. (प्रतिनिधी)