मातृतीर्थ कुंड बनला मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: August 31, 2014 00:15 IST2014-08-30T23:52:00+5:302014-08-31T00:15:10+5:30
श्रीक्षेत्र माहूर : मातृतीर्थ कुंडात भाविकांना धार्मिक कार्य करताना अडचणी येत आहे.

मातृतीर्थ कुंड बनला मृत्यूचा सापळा
श्रीक्षेत्र माहूर : शहरातील मातृतीर्थ कुंडात गेल्या तीन वर्षांआधी पडलेल्या वडाच्या झाडाची महाकाय फांदी अद्याप काढण्यात न आल्याने भाविकांना धार्मिक कार्य करताना अडचणी येत असून आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
शहरात अतिप्राचीन व पौराणिक महत्त्व असलेल्या ९ तलाव कुंड असून हे सर्व पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत़ एकाही तलाव कुंडाची डागडुजी उपसा किंवा देखभाल न झाल्याने हे सर्व ठिकाण जीवघेण्या अवस्थेत आले असून प्रत्येक तलाव व कुंडात भाविकांचा पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही पुरातत्व विभागाने अद्याप एकही तलाव व कुंडाची दुरुस्ती केली नसल्याने पवित्र मानल्या जाणाऱ्या व रेणुका मातेच्या नित्यकर्माशी संबंधित असलेल्या या तलावाच्या किनाऱ्यावर अतिप्राचीन वटवृक्ष असून तीन वर्षांपूर्वी या वडाची प्रचंड मोठी फांदी वादळात कुंडाच्या पाण्यात पडली़ या फांदीला अडकून धार्मिक विधी करणारे चार भाविक मरण पावले होते़ तरीही पुरातत्व विभागाने अद्यापही ही फांदी काढली नसल्याने येथील पूजारी विजय दत्तात्रय आमले यांनी ही फांदी काढण्याची मागणी पुरातत्व विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे़ (वार्ताहर)