मासिआ संघटनेतर्फे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६ लाखांची मदत
By Admin | Updated: June 27, 2014 01:03 IST2014-06-27T00:51:38+5:302014-06-27T01:03:43+5:30
वाळूज महानगर : मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल असोसिएशन (मासिआ) संघटनेने आज मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना ६ लाख रुपयांची मदत केली.

मासिआ संघटनेतर्फे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६ लाखांची मदत
वाळूज महानगर : मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल असोसिएशन (मासिआ) संघटनेने आज मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना ६ लाख रुपयांची मदत केली.
मासिआ व कृषी विभागाने संयुक्तपणे येथील मासिआ सभागृहात गारपिटीमुळे हताश होऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली.
अध्यक्षस्थानी आ. सतीश चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागाचे सहसंचालक जनार्दन जाधव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे, मासिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, उपाध्यक्ष अशोक बेडसे पाटील, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.
आत्महत्या केलेले शेतकरी संपत्ती दराडे, महादेव शेळके, उद्धव तांदळे, कडुबा सपकाळ यांच्या कुंटुबियांना आर्थिक मदत करून त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी तसेच त्यांना पशुधन व ठिबक योजनेसाठी मदत करण्यात आली. गारपिटीमुळे नुकसान झालेले नारायण गाडवे, अनंत पवार, सुनील आपटे, लक्ष्मण पिठोरे, अनिल साळुंके, गोविंद चव्हाण या शेतकऱ्यांनाही मुलांचे शिक्षण, पशुधन व ठिबकसाठी आर्थिक मदत देण्यात आली.
आ. सतीश चव्हाण म्हणाले की, लघु उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला ही कौतुकास्पद बाब असून, याचे इतरांनीही अनुकरण करावे. सतीश चव्हाण यांनी दरवर्षी दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या पहिली ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च आपण करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
एमआयडीसी प्रशासनाने या भागातील लघु उद्योजकांना डीएमआयसीमध्ये उद्योगासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उद्योजकांना भूखंड मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेणार असल्याचे सतीश चव्हाण यांनी सांगितले.
कार्यक्रमात कृषी सहसंचालक जनार्दन जाधव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनीही संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमात मासिआ संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ लाख रुपयांची मदत करणारे उद्योजक अमित शहा यांचा आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील किर्दत यांनी केले. बी. एस. खोसे यांनी प्रास्ताविक केले. आभार बालाजी शिंदे यांनी मानले.
यावेळी माजी अध्यक्ष अशोक काळे, संतोष चौधरी, रणजितसिंग गुलाटी, सुनील भोसले, फुलचंद जैन, राहुल मोगले, अब्दुल शेख, अर्जुन गायकवाड, पुष्पगंध गायकवाड, अनिल पाटील, किरण जगताप, पृथ्वीराज शहा, डी. एल. राजाळे, मासिआ संघटनेचे पदाधिकारी व लघु उद्योजक उपस्थित होते.