मासुर्डी ग्रामस्थांकडून ‘लोकमत’ चे आभार !
By Admin | Updated: March 26, 2016 00:54 IST2016-03-26T00:45:27+5:302016-03-26T00:54:49+5:30
रमेश शिंदे , औसा दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मासुर्डी गावच्या दु:खांना वाचा फोडली ती ‘लोकमत’ने. आम्ही शासन दरबारी हेलपाटे मारुनही आमचे गाऱ्हाणे कुणी ऐकत नव्हते.

मासुर्डी ग्रामस्थांकडून ‘लोकमत’ चे आभार !
रमेश शिंदे , औसा
दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मासुर्डी गावच्या दु:खांना वाचा फोडली ती ‘लोकमत’ने. आम्ही शासन दरबारी हेलपाटे मारुनही आमचे गाऱ्हाणे कुणी ऐकत नव्हते. सांगायचे तर कुणाला सांगायचे ? या पेचात असतानाच जर ‘लोकमत’ची टिम आमच्या गावात ‘आॅन दि स्पॉट’ रिपोर्र्टींगसाठी आली आणि आमच्या गावचे पांग फिटले. आमच्या वेदना केवळ ‘लोकमत’ने मांडल्यानेच आमचे गाव खा. संजय काकडे यांनी दत्तक घेतले, अशा शब्दात मासुर्डीच्या ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
‘लोकमत’ च्या चमुने आॅन द स्पॉट ‘मुक्काम पोस्ट मासुर्डी’ या सचित्र वृत्तांकनातून २४ मार्च रोजी च्या अंकात प्रकाश टाकला़ यासाठी ‘लोकमत’च्या तीन कर्मचाऱ्यांची टीम मासुर्डीत होती. गावात एका टेलरच्या दुकानात मुक्काम ठोकलेल्या या टिमने संपूर्ण गाव पिंजून काढले. १०० हून अधिक माणसांशी चर्चा केल्या. ४० हून अधिक घरांना भेटी दिल्या. ३० शेतकऱ्यांच्या शिवारावर जाऊन पाहणी केली. यानंतर तहानलेल्या मासुर्डीचे वास्तव चित्र महाराष्ट्रासमोर आणले. हे वाचूनच अस्वस्थ झालेल्या खा. संजय काकडे यांनी हे गाव दत्तक घेतले़ तसेच ५० लाख निधी घोषित केला़‘लोकमत’च्या या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी केलेले ‘लोकमत’चे अभिनंदन त्यांच्याच शब्दात.
‘लोकमत’ने मासुर्डीच्या प्रश्नांना दुसऱ्यांदा प्रकाशात आणले. यापूर्वी ‘टँकरसाठी रात्रभर जागे राहते गाव’ अशी बातमी दोन वर्षापूर्वी केली होती. यानंतर राज्यातील साऱ्या वाहीन्यांच्या प्रतिनिधींनी याचे वृत्तांकन केले आणि आमचा प्रश्न प्रकाशात आणला. आता दुसऱ्यांदा ‘लोकमत’ची टिम मासुर्डीत आली आणि गाव दत्तक गेले. ‘लोकमत’मुळे जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळ भोगणाऱ्या मासुर्डीच्या व्यथा प्रकाशात आल्याच्या भावना नागरिकांनी मांडल्या.
अहो, कोण ऐकतय आमचं गाऱ्हाणं. २०१४ ला तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी सगळीकडे टँकरसाठी फिरलो. कुणी दाद देत नव्हते. शेवटी मतदानावर बहिष्काराचे हत्यार काढले तेव्हा कुठे टँकर मिळाला. आताही आमचा आवाज कुणीच ऐकत नव्हते. केवळ ‘लोकमत’मुळे आमच्या दु:खाला वाचा फोडली - बाळासाहेब काळे, मा़ चेअरमन, सोसायटी
‘लोकमत’ची टिम आमच्या गावात २४ तास होती़ टिम गावात असताना कांही तरी असेल असे वाटले़ पण प्रत्यक्षात जेव्हा २४ मार्चचा ‘लोकमत’ बघितला तेव्हा त्यांनी आमच्या गावाला जगासमोर आणल्याचे लक्षात आले़ त्यांच्या या बातमीमुळे आमच्या गावातील समस्यांची महाराष्ट्रात चर्चा झाली आणि संजय काकडे यांनी आमचे गाव दत्तक घेतले़ शिवाय ई-पेपरमुळे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचले.- राहूल आळणे, व्हा़ चेअरमन