लोकसहभागातून भाकरवाडीत गाळ उपसा
By Admin | Updated: May 31, 2014 01:05 IST2014-05-31T01:02:21+5:302014-05-31T01:05:43+5:30
काकाजी तिडके, भाकरवाडी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे.
लोकसहभागातून भाकरवाडीत गाळ उपसा
काकाजी तिडके, भाकरवाडी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन पाझर तलावातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे. बदनापूरचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांनी तलावातील गाळ काढण्याचा संकल्प केला. लगेच २० मे रोजी मुहूर्तसुद्धा साधला. तहसीलदार क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरूवात केली. यावेळी मंडळ अधिकारी बी.डी. भांबले, तलाठी अभिजीत पाटील हे उपस्थित होते. इसा पटेल, लक्ष्मण मसलकर, दादाराव तिडके, बाबासाहेब तिडके, सत्तार पटेल, सावळा हरि तिडके, समद पटेल, ज्ञानेश्वर तिडके यांच्यासह अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. या तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी जेसीबी मशिन व ट्रॅक्टर्स वापरात आणले आहेत. त्याव्दारे परिसरातील शेतकरी गाळ काढून नेऊ लागले आहेत. या गाळामुळे जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे. तलावातील गाळ शेतकर्यांनी न्यावा, असे आवाहन तहसीलदार क्षीरसागर यांनी केले. सोमठाण्यातही उपसा बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा येथील धरणातील गाळउपसा सुरूवात करण्यात आली आहे. १२ गावात सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आहेत. मागील काही वर्षापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत होते. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याचा परिणाम पाणी साठवणीवर होत आहे. त्यामुळे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून गाळ उपशास सुरूवात करण्यात आली. २६ मे रोजी क्षीरसागर यांनी गाळ उपसाच्या कामास भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच दत्ता नागवे, पोलिस पाटील रमेश नागवे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दोन दिवसात या धरणातील ३०० ब्रास गाळ काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ढोकसाळ, भाकरवाडी, भराडखेडा येथील ग्रामस्थांनी गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.सोमठाणा येथील हा दुधना मध्यम प्रकल्प १९६५ साली उभारण्यात आला. पावसाळ्यात यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होते. या जलसाठ्याचा परिसरातील ३४ गावांतील शेतकर्यांना शेती पिकांसाठी फायदा होतो आहे. १२ गावांना धरण परिसरातील विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठवणुकीवर त्याचा परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढावी म्हणून गाळ काढण्याचे काम प्रशासनाने लोकसहभागातून हाती घेतले आहे.