शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जम्बो कार्यकारिणीत निष्ठावंतांना डच्चू ; आयारामांना मानाचे पान मिळाल्याने खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 12:42 IST

इतर पक्षांतून आलेल्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान दिल्याने निष्ठावंतात खदखद

छत्रपती संभाजीनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी राज्य कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेश पदाधिकारी ४७, कार्यकारिणी सदस्य ६४ आणि २८७ विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश असलेल्या जम्बो कार्यकारिणीत मराठवाड्यातील निष्ठावंतांना डच्चू मिळाल्याने अनेकांच्या मनात खदखद सुरू झाली आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान मिळाले, मात्र तीन ते चार दशकांपासून पक्षात काम करणाऱ्यांना संधी न मिळाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कार्यकारिणी सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून दोन्ही ठिकाणी काही जणांचे नाव आले आहे. तर जे काँग्रेस व इतर पक्षांतून काल-परवा पक्षात आले, त्यांना चिटणीसपदावर संधी देण्यात आली आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्ये १७ उपाध्यक्षांत गजानन घुगे, अजित गोपछडे, एजाज देशमुख हे तिघे ३ मराठवाड्यातील आहेत. सहा सरचिटणीसांमध्ये संजय केणेकर हे एकमेव मराठवाड्यातील आहेत. १६ चिटणीसांमध्ये देवीदास राठोड, शालिनी बुंदे, सुरेश बनकर आणि किरण पाटील तर संघटनमंत्री संजय कौडगे यांचे नाव यादीत आहे.

काँग्रेसमधून आलेले किरण पाटील यांनी शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढविली. त्यांना राज्य कार्यकारिणीत संधी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी महापौर, उपमहापौरांसह काही माजी नगरसेवकांना प्रदेश कार्यकारिणीत संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांना संधी मिळाली नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. बसवराव मंगरूळे यांना उपाध्यक्षपदावरून काढून कार्यकारिणी सदस्य करण्यात आले आहे. साधना सुरडकर यांनाही कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.

मकरिये यांना ऐन वेळी डावललेसहकार मंत्री अतुल सावे यांचे निकटवर्तीय तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेले अनिल मकरिये यांना ऐन वेळी डावलण्यात आल्याची कुजबुज सुरू आहे. त्यांना उपाध्यक्ष करण्याचा शब्द वरिष्ठांनी दिला होता. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. याप्रकरणी मकरिये यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

मराठवाड्यातून किती जणांना संधी?मराठवाड्यातून प्रदेश कार्यकारिणीच्या प्रमुख प्रवाहात फक्त ९ जणांना संधी मिळाली आहे. तर १० कार्यकारिणी सदस्य विभागातील आहेत. विशेष निमंत्रितांमध्ये विद्यमान मंत्री, माजी आमदार व पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

टॅग्स :BJPभाजपाMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद