कर्नाटकातील प्रेमीयुगुल सापडले धारुरात
By Admin | Updated: September 16, 2015 00:02 IST2015-09-16T00:02:44+5:302015-09-16T00:02:44+5:30
धारूर : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील निंडागुदी येथून पळून आलेल्या प्रेमीयुगुलास पोलिसांनी जहांगिरमोहा येथून मंगळवारी ताब्यात घेतले.

कर्नाटकातील प्रेमीयुगुल सापडले धारुरात
धारूर : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील निंडागुदी येथून पळून आलेल्या प्रेमीयुगुलास पोलिसांनी जहांगिरमोहा येथून मंगळवारी ताब्यात घेतले.
शरणाबसू हनुमंता डोणी असे तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत आढळलेली मुलगी अल्पवयीन आहे. ते दोघे एकाच गावात राहतात. ८ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांनी गावातून धूम ठोकली. जहांगिरमोहा येथील ऊसतोड मजूर शेख आस्लम हे ऊसतोडीसाठी कर्नाटकात गेले होते, त्यांच्या ओळखीने शरणाबसू हा कर्नाटकातून प्रेयसीसह थेट धारुरात पोहोचला. तिकडे मुलीच्या नातेवाईकांनी मिलागुंडी ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली.
गुप्त माहितीवरुन मंगळवारी धारुर पोलिसांनी जहांगिरमोह्यातून त्या दोघांना ताब्यात घेतले. मुलीच्या नातेवाईकांना कळविले असून ते तिला घेण्यासाठी धारुरकडे रवाना झाल्याचे सहायक फौजदार संजय सूतनासे यांनी सांगितले. त्या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)