प्रेयसीला लावला चुना
By Admin | Updated: December 17, 2015 00:12 IST2015-12-17T00:00:13+5:302015-12-17T00:12:43+5:30
औरंगाबाद : आतापर्यंत प्रियकराच्या पैशावर मजा मारणाऱ्या अनेक प्रेयसींबाबत पोलिसांत तक्रारी झालेल्या आहेत. मात्र, येथे एका प्रियकरानेच प्रेयसीला चुना लावला.

प्रेयसीला लावला चुना
औरंगाबाद : आतापर्यंत प्रियकराच्या पैशावर मजा मारणाऱ्या अनेक प्रेयसींबाबत पोलिसांत तक्रारी झालेल्या आहेत. मात्र, येथे एका प्रियकरानेच प्रेयसीला चुना लावला. प्रेमाचे नाटक करून तिचे अश्लील फोटो व्हॉटस्अॅपवर मागवून घेतले. नंतर आपल्या दोन मित्रांना फोन करायला लावून तिच्याकडून तब्बल ४० हजार रुपये उकळले. ही घटना हर्सूल भागात १० डिसेंबर रोजी घडली.
अजित जाधव (रा. कामगार चौक, एम-२, मैदानासमोर) व अन्य दोन यांनी हा कट रचल्याचे पोलीस निरीक्षक वसीम हाशमी यांनी सांगितले. मयूरपार्कमधील एका २४ वर्षीय मुलीचे अजित जाधव याच्यावर प्रेम होते. जाधव याने प्रेमाचे नाटक करून प्रेयसीकडून तिचेच अश्लील फोटो व्हॉटस् अॅपवर मागवून घेतले. ते फोटो जाधव याने नंतर आपल्या दुसऱ्या मित्रांना दिले. या फोटोच्या जोरावर त्यांनी त्याच्या प्रेयसीकडून पैसे उकळले.
तसेच तुझा मित्र अजित जाधव हा एका आमदाराच्या मुलाच्या खुनाच्या गुन्ह्यात अडकला असल्याची बतावणी केली. त्यामुळे अजितच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांची पोलीस चौकशी करणार आहेत. शिवाय या यादीत तुझे एक नंबरवर नाव असल्याची भीती तिला घातली. यामुळे प्रेयसीने घाबरून गणेश उत्तरेश्वर पाठक याच्या नावावर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यात ४० हजार रुपये जमा केले. हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास फौजदार जवखेडे करीत आहेत.