प्रेमाचा जांगडगुत्ता गं़़़

By Admin | Updated: July 26, 2014 01:07 IST2014-07-26T00:46:51+5:302014-07-26T01:07:41+5:30

भारत दाढेल, नांदेड पे्रमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता ग़ं़़ उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंंबळ रट्टा गं़़़ गावबोलीतील शब्दांनी दरवळलेल्या पे्रमाच्या गोष्टींचा सुंगध शुक्रवारी

Love the zigzag of love | प्रेमाचा जांगडगुत्ता गं़़़

प्रेमाचा जांगडगुत्ता गं़़़

भारत दाढेल, नांदेड
पे्रमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता ग़ं़़ उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंंबळ रट्टा गं़़़
गावबोलीतील शब्दांनी दरवळलेल्या पे्रमाच्या गोष्टींचा सुंगध शुक्रवारी कवीसंमेलनात दरवळला अन रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला़ कवी केशव खटींग यांच्या निवेदनाने संमेलनात अधिकच रंगत आली़
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या या कवीसंमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कवी डॉ़ विठ्ठल वाघ होते़ डॉ़ जगदीश कदम, प्रा़ रविचंद्र हडसनकर, प्रा़ मनोज बोरगावकर, प्रा़ महेश मोरे, नारायण पुरी, महेंद्र शेळके या कवींची उपस्थिती होती़
ग्रामीण पे्रम कवितांची उधळण करीत सर्वच कवींनी रसिकांनी उत्स्फुर्त दाद मिळविली़ प्रारंभी, विठ्ठल वाघ यांनी ओलीत ही कविता सादर करून वातावरण गंभीर केले़ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भ देत वाघ म्हणाले, शेकडो शेतकरी आत्महत्या करू द्या म्हणून विनंती करत आहेत़ ही शोकांतिका आहे़ शेतकऱ्यांच्या वेदनांची दाह मांडणारी ओलित ही कविता त्यांनी सादर केली़
कोरडे जे शेत आहे, ओलेच झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुखया, बोलेत आले पाहिजे़़
सामाजिक, राजकीय परिस्थितीची उकल करताना विसंगतीचे कसे दर्शन होते, याचे वास्तव डॉ़ जगदीश कदम यांनी आपल्या कवितेतून मांडले़ काय राव बाता हाणता, अन म्हणल तर म्हणल म्हणता़़़ सहज, सोप्या शब्दांची कवितेत गुंफन करीत कदम यांनी राजकीय नेते, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे खोटे वर्तन उघडे पाडले़ रविचंद्र हडसनकर यांची ‘माय भक्का भक्का करीत गाडी ठेसणात आली’ ही कविताही दाद मिळवून गेली़ ठेसनात आलेल्या वऱ्हाडाचे चित्रण करताना मानवी भाव- भावनांचा अविष्कार त्यांनी प्रकट केला़ प्रा़ मनोज बोरगावकर यांनी ‘बाई माणसाला जळण्यासाठी फारसे लाकडे लागत नाहीत़़़ कारण आयुष्यभर ती जळतच राहते ’़़़ ही वेगळ्या आशयाची ‘मी जातच राहिल प्रेत यात्रेला’़़़ ही कविता सादर केली़ तुळजापूर येथील नारायण पुरी यांची जांगडगुत्ता ही कविता वन्समोअर झाली़ तु मनसेचे एैलान प्रिये, मी सावध धनुष्यबाण प्रिये, मी वेळ हातावर आलेली, तु कमळापरी बेभान प्रिये़़़ तु सत्ताधारी माजोरी, मी हाताशलेली जनता गं़़़
कवी केशव खटींग यांनी ‘आस लागली संसाराची मनी गं़ अन रानात राबतोय कुणबीनीचा धनी गं़’़़ ही कविता सादर केली़ या कवितेला रसिकांनी डोक्यावर घेतले़ खटींग यांच्या सूत्रसंचालनाने प्रभावी ठरलेल्या कवीसंमेलनात हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे यांनीही आपल्या कलेद्वारे रसिकांची मने जिंकले़ आयोजक माधव पावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले़

Web Title: Love the zigzag of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.