लगीनघाईत पुढाऱ्यांची होतेय दमछाक
By Admin | Updated: May 10, 2015 00:19 IST2015-05-10T00:07:14+5:302015-05-10T00:19:19+5:30
शेषराव वायाळ , परतूर लगीनघाईत पुढाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असून प्रत्येकाच्या खिशात ३० ते ३५ लग्न समारंभाची यादी असल्याने कुठे लग्न,

लगीनघाईत पुढाऱ्यांची होतेय दमछाक
शेषराव वायाळ , परतूर
लगीनघाईत पुढाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असून प्रत्येकाच्या खिशात ३० ते ३५ लग्न समारंभाची यादी असल्याने कुठे लग्न, क ुठे वागींसा, तर कुठे भेटीवर पुढाऱ्यांना भागवावे लागत आहे.
यावर्षी लग्नतिथी कमी असल्याने एकाच तिथीवर मोठया संख्येने लग्न व इतर समारंभ येत आहेत. या मुळे या लग्न समारंभाला उपस्थिती लावताना पुढाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. प्रत्येकाच्या खिशात ३० ते ३५ लग्न समारंभाची यादी असल्याने प्रत्येक विवाह सोहळयास उपस्थिती लावणे शक्य नाही.
त्यामुळे पुढारी दिवसभरात या सोहळ्यातील कुठल्या तरी एका विधीस हजेरी लावत आहेत. इतकी धावपळ करूनही सर्वच लग्नास भेटी देणे शक्य देता येणे शक्य नाही. तर, मोबईलवरूनही शुभेच्छा देण्याचा मार्ग शोधून काढण्यात आला आहे.
या लग्नसराईच्या भेटीगाठीत विवाह सोहळयास भेट देण्याबरोबरच नुकतीच विधान लढवून एकमेकावर आरोप - प्रत्यारोप करणारे उमेदवारही एकमेकांना भेटत आहेत. बऱ्याच विवाह सोहळयात या सर्व उमेदवारांचा एकत्र बसून गप्पाही मारण्याचा योग येत आहे.
यामध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, सभापती बाबासाहेब आकात या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे अॅड. अन्वर देशमुखही या सोहळ्यांना हजेरी लावतांना दिसत आहेत.
यामध्ये ऐनवेळी विधानसभा निवडणूकीत ‘एन्ट्री’ करणारे सोमनाथ साखरे, प्रा. राजेश सरकटे, निवास चव्हाण हे मात्र दिसेनासे झाले आहेत. पुढाऱ्यांच्या या हजेरीतून बरेच विनोदी किस्सेही घडत आहेत. हे सर्व एकत्र बसल्यावर कोण कोणाला भेटले, निवडणुकीनंतर कोणी कोणाशी जुळवून घेतले, आता निवडणूका झाल्या विकासाठी एकत्र येवू, कोणाचे काय चालले यावर टोमणेबाजी करून मार्मिक चर्चेच्या फ ैरी झडत आहेत.
या सर्वांच्या आगमनाने वधू किंवा वर पित्याचीही चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. पुढाऱ्यांच्या विविध सोहळ्यांना लागत असलेल्या या हजेरीवरून व तेथे त्यांच्यात झडत असलेल्या चर्चेच्या फेऱ्यांवरून विविध अंदाज लावणाऱ्यांचीही कमी नाही. याबरोबरच पुढारीही कोणी कोणाला मतदान केले हे विसरून विवाह सोळयांना हजेरी लावत आहेत.
या विवाह सोहळयांच्या अवाक्याबाहेरील तिथींना तोंड देण्यासाठी पुढाऱ्यांची मुले व सौभाग्यवतीही हजेरी लावून वधू व वर पित्याचे समाधान करीत आहेत. कितीही प्रयत्न केला तरी, प्रत्येक पुढारी प्रत्येक सोहळयास हजेरी लावू शकत नाही, यामध्ये मंदाताई लोणीकर, जि. प. सदस्या अशाताई आकात, माजी नगराध्यक्षा विमलताई जेथलिया, माजी. जि. प. उपाध्यक्ष राहूल लोणीकर, पं. स. सदस्य कपिल आकात, नितीन जेथलिया यांचा समावेश आहे.