लॉटरीचालकावरही गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 28, 2017 23:29 IST2017-03-28T23:26:33+5:302017-03-28T23:29:37+5:30
अंबाजोगाई : दोन पोलिसांनी मारहाण करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरुन लॉटरीचालकावरही मारहाण केल्यावरुन सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला.

लॉटरीचालकावरही गुन्हा दाखल
अंबाजोगाई : पैशाच्या कारणावरुन दोन पोलिसांनी मारहाण करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरुन लॉटरीचालकावरही मारहाण केल्यावरुन सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला.
शहरातील पालिकेजवळील गार्डनसमोर असलेल्या लॉटरी सेंटरमध्ये लॉटरीमालक व दोन पोलिसांत शनिवारी रात्री वाद झाला होता. याप्रकरणी लॉटरीचालक सय्यद अन्सार सय्यद अजहर यांच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्याचे पोकॉ अनंत इंगळे व बर्दापूर ठाण्याच्या एका पोलिसावर जबरी चोरीचा गुन्हा शहर पोलिसांत दाखल झाला होता.
दरम्यान, पोकॉ इंगळे यांनीही सोमवारी लॉटरीचालक सय्यद अन्सार व इतर सहा साथीदारांवर मारहाण केल्याची फिर्याद दिली. तक्रारीत म्हटले आहे की, यापूर्वी मटक्याची केस केली म्हणून या सर्वांनी लॉटरीसेंटरमध्ये ओढत नेऊन शटर बंद करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. (वार्ताहर)