स्वस्तात सोने देण्याचे आमिष; युवकाला गंडा
By Admin | Updated: March 31, 2015 00:41 IST2015-03-31T00:21:37+5:302015-03-31T00:41:04+5:30
वाळूज महानगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून युवकाला दोन हजारांना गंडा घालणाऱ्या सासू व तिच्या सुनेला रविवारी वाळूज पोलिसांनी अटक केली

स्वस्तात सोने देण्याचे आमिष; युवकाला गंडा
वाळूज महानगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून युवकाला दोन हजारांना गंडा घालणाऱ्या सासू व तिच्या सुनेला रविवारी वाळूज पोलिसांनी अटक केली. या महिलांच्या ताब्यातून ४ तोळ्याचे नकली सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
विजय दिलीप गुरव हे मार्केटिंग प्रतिनिधी असून, रेल्वेमध्ये विविध वस्तू प्रवाशांना विकून उदरनिर्वाह करतात. महिनाभरापूर्वी रेल्वे प्रवासात त्यांची दोन महिलांबरोबर ओळख झाली होती. या महिलांनी स्वस्तात सोने देण्याची थाप मारली होती. सध्या पैसे नाहीत, असे सांगितल्यावर विजयचा मोबाईल क्रमांक त्यांनी घेतला. काही दिवसांनी या महिलांनी विजयच्या मोबाईल क्रमांकावर सतत संपर्क साधून स्वस्तात सोने देऊ म्हणून त्याला वाळूजला येण्याची गळ
घातली.
२९ मार्चला दुपारी विजय वाळूजला आला. या महिलांनी त्याला बाजारतळाजवळ बोलावून आपल्याकडे असलेले सोन्याचे दागिने दाखविले. सोने खरे असल्याचे भासविण्यासाठी या महिलांनी दोन खऱ्या सोन्याचे मणी विजयला
दिले.
सध्या फक्त दोन हजार रुपये असल्याचे विजयने सांगताच बाकीचे पैसे नंतर दे, असे म्हणून त्यांच्याजवळील दोन हजार रुपये घेऊन त्यास गंठण व सोन्याचे कडे देऊन निघून गेल्या. दरम्यान, या वस्तू नकली सोन्याच्या असल्याचे लक्षात येताच विजयने तात्काळ वाळूज पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागरसिंग राजपूत, पोकॉ. विद्या जाधव, पोकॉ. जाधव यांनी विजयला सोबत घेऊन महिलांचा शोध सुरू केला.