हागणदारीमुक्त गावांतही ‘लोटा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 01:01 IST2017-04-14T01:01:04+5:302017-04-14T01:01:40+5:30
लातूर : हागणदारीमुक्त गावांत आजही ‘लोटा’ सुरुच असल्याचे गुरुवारी निदर्शनास आले आहे़

हागणदारीमुक्त गावांतही ‘लोटा’!
लातूर : एकीकडे प्रशासनाने हागणदारीमुक्त गाव करण्याचा धडका सुरु केला आहे़ हागणदारीमुक्त झालेल्या गावांचा गौरवही केला जात आहे़ परंतु, या हागणदारीमुक्त गावांत आजही ‘लोटा’ सुरुच असल्याचे गुरुवारी निदर्शनास आले आहे़ त्यामुळे स्वच्छ भारत अभियानचा फज्जाच उडाल्याचे दिसून येत आहे़
या हागणदारीमुक्त गावांपैकी दैठणा (ता़ शिरुर अनंतपाळ), नांदुर्गा (ता़ औसा), सेलू (ता़ रेणापूर), तळेगाव (ता़ देवणी), घरोळा, बनसावरगाव (ता़ चाकूर), हिप्पळगाव (ता़ अहमदपूर), अवलकोंडा (ता़ उदगीर), कोळनूर (ता़ जळकोट) गावांची पाहणी केली असता बहुतांश नागरिक हे उघड्यावर शौचास जाण्यासाठी धावपळ करीत असल्याचे दिसून आले़ त्यामुळे इतर हागणदारीमुक्त गावांची स्थिती यापेक्षा वेगळी काय असणार?