श्रमदानातून उभारली परिवर्तनाची गुढी
By Admin | Updated: May 26, 2015 00:50 IST2015-05-26T00:19:30+5:302015-05-26T00:50:39+5:30
उदयनराजे भोसले--कोंडवे

श्रमदानातून उभारली परिवर्तनाची गुढी
येणेगूर : येथील बसस्थानकाच्या पाठीमागे आढळलेला १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा गुटखा अखेर तिसऱ्या दिवशी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ताब्यात घेतला़ या प्रकरणी अज्ञात इसमांविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, गुटखा फेकून देणाऱ्यांचा ठावठिकाणा लागणार कधी ? हा प्रश्न आता समोर येत आहे़
येणेगूर येथील बसस्थानकाच्या पाठीमागील भागात शनिवारी १ लाख २६ हजार ३४८ रूपयांचा गुटखा आढळून आला होता़ घटनेची माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला होता़ याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती देवून हा गुटखा येणेगूर दुरक्षेत्रात ठेवण्यात आला होता़ मात्र, नियमाप्रमाणे पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर मुद्देमाल ताब्यात घेण्याची भूमिका अन्न व औषध प्रशासनाने घेतल्याने शनिवारी रात्रीपर्यंत सदरील गुटखा दूरक्षेत्राच्या इमारतीत पडून होता़ रविवारची सुटी आल्याने पुन्हा दुसरा दिवसही पोलिसांना या गुटख्याला राखण बसावे लागते़ तर सोमवारी सकाळी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी व्ही़एस़लोंढे, सहाय्यक पी़यू़आकोसकर, चालक डी़एमग़ाढवे यांनी येणेगूर दूरक्षेत्र गाठले़ गुटख्याची मोजदाद करून हा गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे़ गुटखा ताब्यात घेवून मुरूम पोलीस ठाण्यात गुटखा बेवारसरित्या सोडून देणाऱ्यांविरूध्द फिर्याद देण्यात आली आहे़ गुटखा एफडीएने ताब्यात घेतला असला तरी आता गुटखा बेवारस टाकून जाणारा कोण ? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे़ त्यामुळे गुटखा फेकून जाणाऱ्याचा शोध केव्हा लागणार ? किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होणार का ? असे प्रश्न समोर येत आहेत़ (वार्ताहर)