लॉटरी जुगारामुळे पालक त्रस्त

By Admin | Updated: July 1, 2014 01:05 IST2014-07-01T00:41:55+5:302014-07-01T01:05:41+5:30

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर या दुष्काळग्रस्त गावात एक खाजगी लॉटरी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

The lot of gamblers caused by the lottery gambling | लॉटरी जुगारामुळे पालक त्रस्त

लॉटरी जुगारामुळे पालक त्रस्त

दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर या दुष्काळग्रस्त गावात एक खाजगी लॉटरी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील अनेकांचे संसार पार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. उत्पन्नाचे साधन कमी असलेल्या या परिसरात लॉटरी नावाचा जुगार चांगलाच फोफावला आहे.
जुगावरावर पोलिसांनी तात्काळ बंदी टाकण्याची मागणी केली आहे. गाव आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही लॉटरी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर महिलांनी जिल्ह्याच्या मुख्यालयात येऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे सध्या प्रचंड तणाव असून पालकांशी मुलांचा वाद सुरू झाला आहे. काही मुले घरातच चोऱ्या करीत असून दुष्काळग्रस्त पालक हतबल झाले आहेत.
संगणकावर लॉटरी नावाचा जुगार खेळविला जात असून हजारो रूपयांची लूट केली जात आहे. अवघ्या दहा मिनिटात निकाल दिला जात आहे. त्यामुळे क्षणात खिसा रिकामा होत असल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
विकासाचे भविष्य
जुगावरावर पोलिसांनी तात्काळ बंदी टाकण्याची मागणी केली आहे. गाव आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही लॉटरी बंद करण्याची मागणी होत आहे.

Web Title: The lot of gamblers caused by the lottery gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.