काँग्रेसच्या मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद

By Admin | Updated: October 22, 2016 00:29 IST2016-10-22T00:13:06+5:302016-10-22T00:29:40+5:30

जालना : नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या आगामी सावत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक असून,

A lot of enthusiastic response to Congress interviews | काँग्रेसच्या मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद

काँग्रेसच्या मुलाखतींना इच्छुकांचा उदंड प्रतिसाद


जालना : नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या आगामी सावत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक असून, २१ आॅक्टोबर रोजी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीस इच्छुकाचा उदंड प्रतिसाद मिळाला.
नगराध्यक्ष पदासाठी ६ तर ३० प्रभागातून १२४ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती, जालना शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल हफीज यांनी दिली.
जालना नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे गेले ३ दिवस उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. शुक्रवारी महेश भवन येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात नगराध्यक्ष पदासाठी संगीता कैलास गोरंट्याल, विमल अशोकराव आगलावे, पद्मा नारायण भरतीया, माजी आ. शंकुतला नंदिकशोर शर्मा, रेखा विजय चौधरी आणि विद्यमान नगराध्यक्षा पार्वताबाई विठ्ठलराव रत्नपारखे यांनी मुलाखती दिल्या.
याशिवाय, ३० प्रभागांत १२४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यात सर्वसाधारण, मागास प्रवर्ग आण िमहिलांनी सुध्दा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत निवडून येण्याचा विश्वास समितीला दिला. यावेळी निवड समितीत समावेश असलेले मान्यवर उपस्थित होते.
शुक्रवारी घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींचा अहवाल तयार करण्यात आला असून, शनिवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविणार असल्याची माहिती अब्दुल हफिज यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: A lot of enthusiastic response to Congress interviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.