सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष संवाद हरवले
By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:40+5:302015-12-14T23:53:04+5:30
शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे.

सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष संवाद हरवले
शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे.
सोशल नेटवर्किंग साईटवर प्रवेश केल्याने या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकांशी आॅनलाईन संवाद साधण्यात मग्न असतात. आता ग्रामीण भागातही सगळीकडे व्हॉटसअॅपचे वेड पसरले आहे. आता तर चौदा-पंधरा वर्षांची मुले स्मार्ट फोनच्या आहारी पडले आहे. या वयात मुलांना शिक्षण घेण्याची गरज असते; पण या वयात त्यांना व्हॉटसअॅपचे वेड लागले आहे. पालकांनी आपल्या मुलांना आळा घालायला पाहिजे.
माहिती मिळविण्याच्या नावाखाली सोशल नेटवर्कींग गरजेपेक्षा जास्त वापर होत असून विद्यार्थी व तरुण पिढीला या गोष्टीचे व्यसन जडले आहे. काही वेळेस त्याच्या गैरवापरामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. इंटरनेट जमाण्यात तरुण पिढी मैदानी खेळाकडे दिवसेंदिवस विसर पडत आहे.
इंटरनेट माध्यमांमुळे विकासाला चालना मिळत आहे. आपल्या ओळखीच्या किंवा अनोळखी संपर्कात राहून आपल्या संवाद साधण्यासाठी व्हॉटसअॅपचा वापर करीत आहे. आता स्मार्ट फोनच्या रुपाने उपलब्ध सोशल नेटवर्किंगचा जास्त जास्त वापर करण्यात आजच्या युगातील तरुण पिढी आघाडीवर दिसून येत आहे. एक विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वापर होत असल्याने त्याचे काही फायदे तर तोटेही होतात.
नवनवीन माहिती प्राप्त होते. परंतु जास्त वापर केल्याने मानसिक आजार जडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वीच्या काळी सामाजिक ठिकाणी समोरासमोर चर्चा रंगायच्या. यातून संवाद होऊन अनेक नावीन्यपूर्ण माहिती चर्चामधून व्हायची. परंतु आता इंटरनेट व्हॉटसप्अॅप,फेसबूक आदींमुळे कौटुंबिक, सामाजिक विकासासाठी कराव्या लागणाऱ्या चर्चा, प्रत्यक्ष संवाद हरवल्याचे चित्र दिसत आहे. मानवी जीवनात वरदान ठरलेल्या इंटरनेटच्या वापरात सर्वाधिक विद्यार्थी व तरुण पिढी आघाडीवर आहे. (वार्ताहर)