शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकिस्तानमध्ये पासपोर्ट हरवला; १८ वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर हसीना बेगम औरंगाबादमध्ये परतल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 12:46 IST

Woman Returned To India After 18 Years from Pakistan : प्रजासत्ताक दिनी मंगळवारी ( दि. २६ ) हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या आहेत. 

ठळक मुद्देहसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदपुरा परिसरातील आहेत.त्यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील व्यक्तीशी झाला १८ वर्षांपूर्वी त्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासही पाकिस्तानमध्ये गेल्या

औरंगाबाद : पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी औरंगाबादमधील हसीना बेगम १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानामध्ये गेल्या होत्या. या दरम्यान त्यांचा पासपोर्ट हरवल्याने त्यांना तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले. औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तान न्यायालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची सुटका झाली आहे. प्रजासत्ताक दिनी मंगळवारी ( दि. २६ ) हसीना बेगम औरंगाबाद येथे परतल्या आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदपुरा परिसरातील आहेत. त्यांचा निकाह उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचा रहिवासी असलेल्या दिलशाद अहमदसोबत झाला होता. १८ वर्षांपूर्वी त्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासही पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. या दरम्यान, त्यांचा पासपोर्ट लाहोर येथे हरवला. यामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये कैद करण्यात आले. आपण निर्दोष असल्याचं हसीना बेगम यांनी पाकिस्तानच्या कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मागितली. हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.

औरंगाबाद पोलिसांचे मानले आभार भारतात परतल्यानंतर नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. पाकिस्तानातील अनुभवाबाबत हसिना बेगम यांनी सांगितले की, मी अत्यंत बिकट परिस्थितीत होते. या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या मदतीबाबत मी खूप आभारी आहे. मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. हसिना बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांनी सुद्धा औरंगाबाद पोलिसांनी त्यांना देशात परत आणण्यासाठी मदत केल्याबाबत धन्यवाद व्यक्त केले. 

पाकिस्तानला पाठवली माहितीहसिना बेगम यांनी पाकिस्तानच्या न्यायालयात त्या निर्दोष असल्याचा विनंती अर्ज केला. त्यानंतर न्यायालयाने भारतीय पोलिसांना संपर्क साधून माहिती मागवली. औरंगाबाद पोलिसांनी तत्काळ पाकिस्तान न्यायालयास शहरातील सिटी चौक पोलीस स्टेशनअंतर्गत हसीना बेगम यांच्या नावे एक घर रजिस्टर्ड आहे अशी माहिती पाठवली. यानंतर पाकिस्तानने गेल्या आठवड्यात हसीना बेगम यांना मुक्त करत भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPakistanपाकिस्तानCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद