सेल्फीच्या मोहात जीव गमावला

By | Updated: November 29, 2020 04:08 IST2020-11-29T04:08:18+5:302020-11-29T04:08:18+5:30

गंगापूर : मोबाईलने सेल्फी काढण्याचा मोह लहानांपासून थोरा-मोठ्यांना होतो. या मोहापायी अनेकदा दुर्घटनाही घडत आहेत. अशाचा दुर्दैवी घटनेचा प्रत्यय ...

Lost his life in the temptation of selfie | सेल्फीच्या मोहात जीव गमावला

सेल्फीच्या मोहात जीव गमावला

गंगापूर : मोबाईलने सेल्फी काढण्याचा मोह लहानांपासून थोरा-मोठ्यांना होतो. या मोहापायी अनेकदा दुर्घटनाही घडत आहेत. अशाचा दुर्दैवी घटनेचा प्रत्यय कायगाव येथे आला. कायगाव येथे सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात शनिवारी दुपारी ३ वाजता नेवासा येथील गीता शंकर जाधव (२१) या विवाहितेचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.

नेवासा येथील गीता शंकर जाधव या आपल्या भावासह नेवासा येथे सासरी जात होत्या. औरंगाबाद ते नेवासादरम्यान कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून जात असताना गीता जाधव यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या भावाला कायगाव येथील नदीच्या पुलावर सेल्फी घेण्यासाठी थांबवले. तेथे सेल्फी घेत असतानाच गीता जाधव यांचा अचानक तोल गेला व त्या गोदावरी नदीपात्रात बुडाल्या. यावेळी उपस्थित त्यांच्या मदतीसाठी धावले व त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आठ महिन्यांआधीच झाले लग्न

नेवासा येथील गीता जाधव यांचे आठ महिन्यांआधी औरंगाबाद येथील तरुणाशी विवाह झाला होता. सुखाचा संसार सुरू होता. मात्र, काळाने अचानक घाला घातला. या घटनेमुळे जाधव व खैरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामहरी चाटे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

Web Title: Lost his life in the temptation of selfie