शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेगामुळे जीव गमावला; भरधाव स्पोर्ट्सबाईक दिशादर्शक फलकाला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:49 IST

कागजीपूरा येथील घटना, मृत औरंगाबाद येथील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी

खुलताबाद (औरंगाबाद) : कागजीपूरा येथील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली. बाईकचा वेग खूप जास्त असल्याने दिशादर्शक फलकाला धडक दिल्यानंतर दोघेही रस्त्याच्या खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच दगावले. 

औरंगाबाद येथील मधूर बाळासाहेब भंडगे ( २३ रा. धन्वंतरीनगर, सातारा परिसर, औरंगाबाद ) आणि जयेश निरंजन घोरपडे ( २२ रा. पहाडसिंगपुरा औरंगाबाद ) अशी मृतांची नावे आहेत. मधुर आणि जयेश आज सायंकाळी आणखी दोन मित्रांसह दोन दुचाकीवर (खुलताबादकडे ) येते होते. दरम्यान, कागजीपुरा येथील वळणावर नियंत्रण सुटल्याने मधूर व जयेश यांची स्पोर्ट्स बाईक (एम. एच. २० ई. व्ही. १११३) थेट दिशादर्शक फलकावर धडकली.

वेग जास्त असल्याने मधुर आणि जयेश रस्त्याच्या खाली कोसळले. याच वेळी दोघांचेही डोके दगडांवर आदळले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच खुलताबादचे बीट जमादार शेख जाकीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. कागजीपुराचेसरपंच शेख अहेमद, मयूर फुलारे इतरांनी मदतकार्य केले. जयेश घोरपडे व मधूर भंडगे हे कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू