वाहनधारकांचा ‘पीयूसी’ तपासणीला खो
By Admin | Updated: December 16, 2015 23:30 IST2015-12-16T23:18:27+5:302015-12-16T23:30:35+5:30
परभणी : शहरातील दुचाकी, तीन चाकी आॅटो व ट्रक, बसेससारख्या वाहनातून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनातून होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाच्या तपासणीकडे वाहनधारक दुर्लक्ष करीत आहेत.

वाहनधारकांचा ‘पीयूसी’ तपासणीला खो
परभणी : शहरातील दुचाकी, तीन चाकी आॅटो व ट्रक, बसेससारख्या वाहनातून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. वाहनातून होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाच्या तपासणीकडे वाहनधारक दुर्लक्ष करीत आहेत. कागदोपत्री पीयूसी प्रमाणपत्र जोडून आपली कामे करून घेण्याचा सपाटा सध्या वाहनधारकांनी लावला आहे.
परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दोन अधिकृत पीयूसी केंद्रांची नोंद आहे़ प्रत्येक वाहनधारकाने दर सहा महिन्यांतून एकदा त्यांच्याकडील वाहनाची पीयूसी तपासणी करून घेणे बंधनकारक आहे़. असे असले तरी शहरातील वाहनधारक पीयूसीची तपासणी करीत नाहीत़ यात जुने आॅटो, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर व जड वाहने, बसेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. काही वाहनधारक आपल्या वाहनात रॉकेलचा वापर करतात़ त्यामुळे या प्रदूषणात वाढ होते़ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या सर्व वाहनधारकांनी दर सहा महिन्यातून एकदा ही तपासणी करणे आवश्यक असते़ असे न केल्यास त्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जातो़ बहुतांश वाहनांमधून घातक काळा धूर बाहेर पडतो़ या धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते़ एसटी बसेसमधून उत्सर्जीत होणाऱ्या हधुरामुळेही आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो़ परंतु, परभणी जिल्ह्यात वाहनचालक पीयूसी तपासणीकडे कानाडोळा करीत असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले़