जन धन योजनेला बँकांचा खो
By Admin | Updated: September 17, 2014 01:12 IST2014-09-17T00:43:32+5:302014-09-17T01:12:39+5:30
उस्मानाबाद : केंद्र शासनाने आर्थिक अस्पृशता संपविण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या जन धन योजनेबाबत खाते उघडण्यासाठी बँकांची उदासीनता दिसून येत आहे.

जन धन योजनेला बँकांचा खो
उस्मानाबाद : केंद्र शासनाने आर्थिक अस्पृशता संपविण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या जन धन योजनेबाबत खाते उघडण्यासाठी बँकांची उदासीनता दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३९ हजार ५३५ नागरिकांची खाते काढण्यात आली आहेत. या योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून गोरगरीब जनतेच्या भवितव्यासाठी सुरु केलेल्या या योजनेत नागरिकांना बँक खाते काढण्याकरीता मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
१५ आॅगस्ट रोजी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते उघडण्यासाठीच्या या संकल्पनेची घोषणा केली . त्या अनुषंगाने जन धन योजनेला प्रारंभ झाला. जन धन योजनेतंर्गत बँक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र या योजनेमध्ये अधिकाअधिक बँक खातेदार गरीब आहेत. काहीना बँकेच्या व्यवहाराची माहिती नाही, ही योजना समजावून घेण्याकरीता नागरिक बँकेत धाव घेत आहेत. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून यांना उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. मात्र त्याकरीता नागरिकांना बँक खाते उघडण्याकरिता मार्गदर्शन करणाऱ्यांचा अभाव दिसून येत आहे. या योजनेमध्ये गोरगरीब नागरिकांचे बँक खाते उघडण्यात येत आहे. मात्र यामध्ये ज्यांचे बँक खाते आधीच आहेत काही मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत नागरिकसुध्दा योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन बँक खाते उघडत असल्याचे आढळून येत आहे. या योजनेबाबत प्रशासन स्तरावर माहिती देणारी यंत्रणा हवी अशी मागणी नागरिकातुन होत आहे.
जन धन योंजनेअंतर्गत प्रशासनाच्या वतीने वारंवार बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या योजनेतील लाभार्थ्यांचे खाते काढून घ्यावे असे वारंवार सूचना दिल्या असल्या तरी बँकाकडून या आदेशाकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील जन धन योजनेची बँकानी काढलेली खाते
जन धन योजनेअंतर्गत १ लाख रुपयांची अपघाती विमा कव्हर, डेबिट कार्ड शून्य - शिल्लक बँक खाते प्रदान केले जाईल. तसेच ३० हजार रुपयांचे जीवन विमा कवच दिले जाणार आहे. बँकेकडून ५ हजार रुपयांचे कर्ज मिळवू शकते याबरोबरच यातील खाते धारक हे रोहयोच्या कामावर असतील तर त्यांची मजुरी संबधितांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.