शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात लूटमार सुरूच; पत्ता विचारून दुचाकीस्वारांनी महिलेचे गंठण हिसकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 19:55 IST

बारा तासांत सिडकोसह पुंडलिकनगरमध्ये दोन महिला लक्ष्य

छत्रपती संभाजीनगर : शहरात महिला, ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे सत्र सुरूच असून, छावणी, एमजीएम परिसरासह पुंडलिकनगरमध्ये तीन महिलांना लक्ष्य करीत दुचाकीस्वार चोरांंनी एकूण पाच तोळ्यांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या.

पार्वती राठोड (७२, रा. सह्याद्रीनगर, पुंडलिकनगर) या पतीसह मंगळवारी सकाळी माॅर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. ७ वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिराकडून दोघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. सह्याद्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर त्यातील एकाने त्यांना थांबवून इमारतीचे नाव विचारले. पार्वती यांनी मान वळवताच मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसका देऊन तोडत पोबारा केला. घटनेची माहिती कळताच पुंडलिकनगरचे निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक विनोद भालेराव, सुनील म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

एमजीएम परिसरातही ज्येष्ठ महिलाच लक्ष्यनिवृत्त शिक्षिका अंजली भाले (६३, रा. टाऊन सेंटर) या ८ सप्टेंबर रोजी रात्री ८:१५ वाजता टाऊन सेंटरच्या दिशेने पतीसह पायी जात होत्या. दुचाकीस्वार चोरांनी रंजलकर रुग्णालयाच्या कोपऱ्यावर त्यांचे २ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. ७ सप्टेंबर रोजी छावणीच्या अमुल चौकात जाता बन्सवाल यांचे ६ ग्रॅम व १२ मणी असलेले मंगळसूत्र हिसकावून नेले.

लूटमार थांबवण्यात पोलिस अपयशीएकट्या ऑगस्ट महिन्यात शहरात लुटमारीच्या २१ घटना घडल्या. आठ महिन्यांत लुटमारीने ७० चा आकडा ओलांडला. मात्र अद्याप एकाही सोनसाखळी चोरीच्या घटनेची पोलिसांना उकल करता आलेली नाही. पुंडलिकनगरच्या घटनेत लुटारूंकडे महागडी विनाक्रमांक स्पोर्ट बाइक होती. दोघांनी हेल्मेट परिधान केले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी