भूखंड खरेदीसाठी प्रियकर पैसे देत नसल्याने केली अपहरणाची तक्रार

By Admin | Updated: August 8, 2016 00:27 IST2016-08-08T00:24:43+5:302016-08-08T00:27:41+5:30

औरंगाबाद : भूखंड खरेदीसाठी प्रियकर बिल्डर मदत करीत नसल्याच्या कारणावरून एका महिलेने थेट त्याच्या चारचाकी गाडीवर दगड घातला.

Looter complained about the purchase of land for the purchase of land | भूखंड खरेदीसाठी प्रियकर पैसे देत नसल्याने केली अपहरणाची तक्रार

भूखंड खरेदीसाठी प्रियकर पैसे देत नसल्याने केली अपहरणाची तक्रार

औरंगाबाद : भूखंड खरेदीसाठी प्रियकर बिल्डर मदत करीत नसल्याच्या कारणावरून एका महिलेने थेट त्याच्या चारचाकी गाडीवर दगड घातला. एवढेच नव्हे तर त्यास तुला आता दाखवतेच, असे म्हणून थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या दोन्ही मुलांचे एका अनोळखी व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार केली. त्या गाडीचा क्रमांकही पोलिसांना दिला. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीअंती महिलेची तक्रार बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
सुंदरवाडी शिवारात राहणारी एक २५ ते ३० वयाची महिला दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांकडे आली. यावेळी रडतच तिने आपला मुलगा (वय ७) आणि मुलीचे (१३) बीड बायपास रोडवरील एका शाळेच्या आवारातून अपहरण करण्याचा प्रयत्न एका जणाने केल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर अपहरणकर्त्याच्या डस्टर गाडीचा नंबरही तिने सांगितला. आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या निरीक्षकांना बोलावून कारवाईचे आदेश दिले. आयुक्तांनी महिला कर्मचाऱ्यांमार्फत त्या महिलेची तक्रार लिहून घेतली. त्या गाडीचा क्रमांकाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत आवारे आणि सहायक निरीक्षक भंडारी यांनी शोध घेतला असता ते वाहन जालना जिल्ह्यातील एका रस्त्याने जात असल्याचे समजले. आरोपीचे नाव आणि नंबरही समजला. एवढेच नव्हे तर त्याच्या नातेवाईक आणि मित्रांचे फोन नंबर मिळवले. त्यापैकी शिवाजीनगर (पान ८ वर)

Web Title: Looter complained about the purchase of land for the purchase of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.