मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेस लुटले
By Admin | Updated: April 3, 2017 22:46 IST2017-04-03T22:46:18+5:302017-04-03T22:46:46+5:30
लातूर :पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे लॉकेट हिसकावत पळ काढल्याची घटना घडली

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेस लुटले
लातूर : शहरातील मंठाळेनगर परिसरातील एक जोडपे मॉर्निंग वॉकसाठी रविवारी पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले. दरम्यान, पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्यांचे लॉकेट हिसकावत पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मंठाळेनगरात राहणाऱ्या उषा प्रशांत विरघे (४७) या आपल्या पतीसमवेत मॉर्निंग वॉकला रविवारी निघाल्या होत्या. दरम्यान, पती काही अंतरावर पुढे गेल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी उषा विरघे यांच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याचे लॉकेट हिसकावत पळ काढला. काही कळायच्या आतच हे लुटारू दुचाकीवरून पसार झाले. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या पतीला दिली. या दोघांनीही लुटारुंचा शोध घेतला. त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक गुंडरे हे करीत आहेत.