कानावर बंदूक लावून भाविक महिलेस लुटले
By Admin | Updated: July 9, 2017 00:30 IST2017-07-09T00:29:51+5:302017-07-09T00:30:57+5:30
पाटोदा : तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या सौताडा येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या कानशिलावर बंदूक लावून दमदाटी करत दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

कानावर बंदूक लावून भाविक महिलेस लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या सौताडा येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या कानशिलावर बंदूक लावून दमदाटी करत दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी सदरील महिलने शनिवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लुटारू ओळखीचे असल्याचा खुलासा सदरील महिलेने केल्याने खळबळ उडाली आहे.
गीता मयूर सदाफुले (रा. सदाफुले वस्ती ता. जामखेड) असे तक्रारदार महिला भाविकाचे नाव आहे. सदाफुले या दर्शनासाठी सौताडा येथे आल्या होत्या. रामेश्वर मंदिराच्या पठारावरील बगीचाजवळ त्या उभ्या होत्या. यावेळी जीपमधून आलेल्या सात जणांनी त्यांच्या कानशिलाला बंदूक लावली. तसेच त्यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील अंदाजे ५० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन त्यांनी पळ काढला. हे सर्व आपल्या ओळखीचे असल्याचे सदरील महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
गीता सदाफुले यांच्या फिर्यादीवरून कबीर सिद्धा धायतिडक, अंकल उर्फ रवि अनिल धायतिडक, योगेश खंडू सदाफुले, किरण जाधव व इतर अनोळखी तीन (सर्व रा. जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.