चारचाकीतून कापूस नेणाऱ्या दोघांना लुटले
By Admin | Updated: December 22, 2014 23:48 IST2014-12-22T23:48:00+5:302014-12-22T23:48:00+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी-सातोना मार्गावर छोटा हत्ती वाहनातून १५ क्ंिवटल कापूस घेऊन जाणाऱ्या दोघांना रस्त्यावर अडवून चाकूचा धाक दाखवित कापसासह वाहन पळवून नेले.

चारचाकीतून कापूस नेणाऱ्या दोघांना लुटले
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी-सातोना मार्गावर छोटा हत्ती वाहनातून १५ क्ंिवटल कापूस घेऊन जाणाऱ्या दोघांना रस्त्यावर अडवून चाकूचा धाक दाखवित कापसासह वाहन पळवून नेले. हातपाय बांधून दोघांना जवळच्या शेतात फरफटत नेऊन फेकून दिले. हा प्रकार २२ डिसेंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला.
आष्टी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास यंत्रणा सक्रीय केली. मात्र रात्री उशिरापर्यंत काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. कोकाटे हादगाव (ता.परतूर) येथील दोन शेतकरी विकास अंबादास डोंगरे व काशीनाथ कुंडलिक तांगडे हे छोटा हत्ती वाहनातून १५ क्ंिवटल कापूस घेऊन सेले येथे विक्रीसाठी जात होते. आष्टी-सातोना मार्गावरील सिद्धकृपा गॅस एजंसीजवळ दोन मोटारसायकलवरून चौघे जण आले. त्यांनी छोटा हत्ती वाहन थांबविले. दोघांनाही खाली उतरून चाकूचा धाक दाखवित खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. रुमालाने त्यांचे हातपाय बांधून फरफटत नेत जवळच्या कापसाच्या शेतात नेऊन टाकले. तब्बल तीन तास परिश्रम करून एकमेकांचे हात सोडले. त्यानंतर आष्टी पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली.
चोरट्यांनी ३ लाख ७१ हजार रूपयांचा ऐवज पळवून नेला. आष्टी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांच्या यांना कळविण्यात आली. त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी पाठविले. आष्टी पोलिसांनीही चौफेर पथके पाठवून आरोपींचा शोध घेतला. मात्र हाती काहीच लागले नाही. अधिक तपास धनराज गव्हाणे करीत आहेत. (वार्ताहर)