बसस्थानक परिसरात एकास तिघांनी लुटले

By Admin | Updated: April 9, 2017 23:25 IST2017-04-09T23:24:40+5:302017-04-09T23:25:26+5:30

लातूर : गांधी चौकाकडून गंजगोलाईकडे पायी निघालेल्या दत्तू व्यंकटनाच बोणे (५०, रा़जयनगर ता़औसा) यांना शनिवारी रात्री तिघांनी २२ हजार रूपयांना लुटल्याची घटना घटली़

Looted by one or the other in the bus station area | बसस्थानक परिसरात एकास तिघांनी लुटले

बसस्थानक परिसरात एकास तिघांनी लुटले

लातूर : गांधी चौकाकडून गंजगोलाईकडे पायी निघालेल्या दत्तू व्यंकटनाच बोणे (५०, रा़जयनगर ता़औसा) यांना शनिवारी रात्री उशीरा अज्ञात तिघांनी धक्काबुक्की करून २२ हजार रूपयांना लुटल्याची घटना घटली़ याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरूद्ध रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
औसा तालुक्यातील जयनगर येथील दत्तू बोणे हे शनिवारी रात्री गांधी चौकातून गंजगोलाईकडे पायी निघाले होते़ दरम्यान, एक महिला आणि अन्य दोन पुरूष साथीदारांनी त्यांचा पाठलाग गांधी चौकातूनच केला़ बसस्थानकानजीक आल्यानंतर या तिघांनी धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली़ दत्तू बोणे यांच्या पँटीच्या खिशात असलेले रोख २२ हजार रूपये काढून घेत तिघांनी पोबारा केला़ दरम्यान, बोणे यांनी यावेळी आरडा-ओरडा केला मात्र त्यांच्या मदतीला कोणी धावून आले नाही़ गावाकडे जात असताना हा प्रकार घडल्याचे बोणे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे़
विशेष म्हणजे बाहेरगावाहून येणाऱ्या अनोळखी वृद्ध नागरिक आणि महिलांना लुटणारी टोळी गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरासह परिसरता सक्रीय आहे़ दुचाकीवरील टोळीकडून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावत धूम टोकणाऱ्या टोळीने तर कहर केला आहे़ आता एकट्या वृद्ध नागरिकाला गाठून, त्यांचा पाठलाग करून त्यांच्या खिशात असलेली रक्कम, मोबाईल याच्यासह मौल्यवान वस्तूंची लूट करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे़
याप्रकरणी दत्तू व्यंकटनाच बोणे यांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी एका महिलेस अज्ञात दोन पुरूषाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ बालाजी जिंकरवाड हे करीत आहेत़

Web Title: Looted by one or the other in the bus station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.