पावणेबारा लाख लुटणारे अखेर जेरबंद

By Admin | Updated: March 17, 2016 00:21 IST2016-03-17T00:19:26+5:302016-03-17T00:21:52+5:30

औरंगाबाद : भरदिवसा दुचाकीस्वाराचा पाठलाग करून तो सिग्नलवर थांबल्यावर ११ लाख ७२ हजार रुपयांची बॅग लंपास करणाऱ्या चौघांना पोलिसांनी तिसऱ्याच दिवशी जेरबंद केले.

Looted millionaire after looting | पावणेबारा लाख लुटणारे अखेर जेरबंद

पावणेबारा लाख लुटणारे अखेर जेरबंद

औरंगाबाद : भरदिवसा दुचाकीस्वाराचा पाठलाग करून तो सिग्नलवर थांबल्यावर ११ लाख ७२ हजार रुपयांची बॅग लंपास करणाऱ्या चौघांना पोलिसांनी तिसऱ्याच दिवशी जेरबंद केले. सेफसिटी प्रकल्पाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या या चोरट्यांच्या मुसक्या सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
सय्यद फरीन सय्यद सलीम, सय्यद जुनेद सय्यद शौकत, सय्यद रफत सय्यद याकूब आणि तय्यब खान नसीम खान (सर्वांचे वय २५ ते ३० आणि सर्व रा. जुना मोंढा) अशी अटकेतील चौघा आरोपींची नावे आहेत. अन्य एक फरार आहे. अटक केलेल्या चौघांपैकी तिघांना पुण्यातून तर एकाला औरंगाबादेतून ताब्यात घेण्यात आले आहे. सय्यद रफत, तय्यब खान आणि फरार असलेला अन्य एक असे तिघे दुचाकीवर होते आणि सय्यद फरीन व सय्यद जुनेद हे दोघे फिर्यादीवर पाळत ठेवून होते.
१४ मार्च रोजी कापूस व्यापारी शेख रियाज शेख वजीर आणि देवराव भावराव पुंड (रा. कौडगाव, ता. औरंगाबाद) या दोघांनी ‘हवाला’मार्फत आलेले ११ लाख ७२ हजार रुपये पेमेंट औरंगपुऱ्यातून घेतले. ही रक्कम घेऊन ते कौडगावकडे जाण्यासाठी निघाले त्यावेळी शेख रियाज हे दुचाकी चालवीत होते, तर देवराव पुंड हे पैशांची बॅग घेऊन पाठीमागे बसले होते. मोंढा नाका-आकाशवाणी चौक-सेव्हन हिलमार्गे ते खंडपीठाच्या सिग्नलपर्यंत आले. येथे सिग्नल लागल्यामुळे त्यांना थांबावे लागले. याचवेळी पाठीमागून एका दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने देवराव पुंड यांच्या हाताला हिसका मारून ११ लाख (पान २ वर)

Web Title: Looted millionaire after looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.