सोन्याचे आमिष दाखवून लुबाडले
By Admin | Updated: September 21, 2014 00:29 IST2014-09-20T23:50:57+5:302014-09-21T00:29:30+5:30
लातूर : एलआयसी कॉलनी भागात राहणाऱ्या सज्जादबी रमजान शेख ऊर्फ मुन्नी या महिलेस आरोपींनी २० सप्टेंबर रोजी साडेबाराच्या सुमारास तीन सोन्याचे बिस्कीट देण्याचे

सोन्याचे आमिष दाखवून लुबाडले
लातूर : एलआयसी कॉलनी भागात राहणाऱ्या सज्जादबी रमजान शेख ऊर्फ मुन्नी या महिलेस आरोपींनी २० सप्टेंबर रोजी साडेबाराच्या सुमारास तीन सोन्याचे बिस्कीट देण्याचे अमिष दाखवून साडेतीन लाख घेवून पोबारा केल्याची घटना घडली़
शहरातील एलआयसी कॉलनी भागात मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या सज्जादबी रमजान शेख या महिलेच्या घरी विश्रांतबाई भोसने रा़इंडीया नगर, मिनी ऊर्फ ऋतुजा रा़एलआयसी कॉलनी भागात ३ जून रोजी फिर्यादीच्या घरी आल्या़ फिर्यादीस सोन्याचे तीन बिस्कीट देतो असे आमिष दाखवून ३ लाख ५० हजार रुपये घेवून निघून गेल्या़ त्या परत आल्याच नाहीत़ याबाबत विचारणा करण्यासाठी २० सप्टेंबर २०१४ रोजी १२़३० वाजण्याच्या सुमारास गेले असता आरोपी विश्रांतबाई भोसने, मिनी ऊर्फ ऋतुजा व करिष्मा यांनी संगनमत करुन फिर्यादीस मारहाण केली़ तसेच घेतलेले साडेतीन लाख रुपये परत न दिल्यामुळे फिर्यादी सज्जादबी शेख ऊर्फ मुन्नी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ४२०,३२३ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ मुन्नी शेख व सुमित पल्लोळ रा़एलआयसी कॉलनी यांनी फिर्यादी ऋतुजा ऊर्फ मिना गिरी रा़ज्ञानेश्वर नगर, एलआयसी कॉलनी येथील २० सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी जावून फिर्यादी विश्रांतबाई भोसने यांच्या विरुद्ध केलेली केस मागे घे म्हणून ओढणी ओढून आरवाच्च भाषेत आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली़ यावरुन कलम ४५२, ३२३, २९४, ३०६, ५०४, ३४ भादविनुसार ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ (प्रतिनिधी)