दुचाकी अडवून एकास लुटले

By Admin | Updated: August 17, 2014 00:55 IST2014-08-17T00:48:59+5:302014-08-17T00:55:14+5:30

उस्मानाबाद : दुचाकी अडवून एकास शिवीगाळ करीत लोखंडी फायटर, गुप्तीने जबर मारहाण करून सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास करण्यात आली़ ही घटना गुरूवारी

Looted a bike and robbed one | दुचाकी अडवून एकास लुटले

दुचाकी अडवून एकास लुटले




उस्मानाबाद : दुचाकी अडवून एकास शिवीगाळ करीत लोखंडी फायटर, गुप्तीने जबर मारहाण करून सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास करण्यात आली़ ही घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील सांजा शिवारात घडली असून, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, उस्मानाबाद शहरातील महात्मा गांधी नगर परिसरात राहणारे प्रशांत श्रीमंतराव रणदिवे हे गुरूवारी रात्रीच्या सुमारास शेतात काम करून घराकडे येत होते़ ते सूर्यवंशी यांच्या शेताजवळील ढाब्याजवळ आले असता विलास पवार, विलास चौगुले व इतर तिघांनी त्यांच्या दुचाकीसमोर दोन दुचाकी लावल्या़ रणदिवे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन व रोख ३५०० रूपये असा ३८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केला़ तसेच रणदिवे यांना शिवीगाळ करीत गुप्ती, फायटरने जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी रणदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि जाधव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Looted a bike and robbed one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.