‘एअरगन’चा धाक दाखवून लुटले
By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:50:45+5:302014-06-25T01:05:35+5:30
उस्मानाबाद : मागील भांडणाची कुरापत काढत एअरगनचा धाक दाखवून युवकास लूटल्याची खळबळजनक घटना उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली़

‘एअरगन’चा धाक दाखवून लुटले
उस्मानाबाद : मागील भांडणाची कुरापत काढत एअरगनचा धाक दाखवून युवकास लूटल्याची खळबळजनक घटना उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेतील दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ तर इतर दोघे फरार आहेत़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील भानूनगर परिसरात राहणारा पंकज कांतराम पवार (वय-२०) हा सोमवारी रात्री१०़३० वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतून दुचाकीवरून शहराकडे येत होता़ तेरणा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर बाळासाहेब बनसोडे (रा़बार्शी नाका), बापू महादेव कांबळे (रा़दत्तनगर), राहुल राजाभाऊ राठोड (रा़दत्त नगर) व एका अनोळखी इसमाने पवार यास अडविले़ त्यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केी़ राहूल राठोड याने हातातील एअरगनचा धाक दाखविला तर बापू कांबळे याने पवार याच्या खिशातील दीड हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले़ घटनेनंतर पवार यांनी तातडीने शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली़ फिर्याद येताच पोनि रायकर यांच्यासह शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बाळासाहेब बनसोडे, बापू कांबळे या दोघांना अटक करून त्यांच्याकडील एअरगन जप्त केली़ अटकेतील दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वरील चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार दोघांचा शोध सुरू आहे़ प्रकरणाचा अधिक तपास पोनि रायकर हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)