उदगीरच्या विक्रेत्यास १३ लाखांना फसविले

By Admin | Updated: November 16, 2015 00:38 IST2015-11-15T23:45:29+5:302015-11-16T00:38:47+5:30

उदगीर : मद्रास येथील रहिवासी असलेल्या चमडा खरेदीदाराने १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी उदगीर शहर पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Looted 13 lacs to the vendor | उदगीरच्या विक्रेत्यास १३ लाखांना फसविले

उदगीरच्या विक्रेत्यास १३ लाखांना फसविले


उदगीर : मद्रास येथील रहिवासी असलेल्या चमडा खरेदीदाराने १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी उदगीर शहर पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उदगीर येथील फिर्यादी बशीर इब्राहीम कुरेशी (५३) हे पशूंच्या चमडा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. कुरेशी यांनी कोडानगिरा (मद्रास) येथील एकबाल याहिया वसिम एकबाल, हाफिज एकबाल यांना १३ लाख रुपयांचा चमडा विक्री केल्यानंतर कुरेशी यांना १३ लाख रुपयांचा धनादेश होता. कुरेशी यांनी हा धनादेशश वटविण्यासाठी बँकेत लावला असता सदरचा धनादेश न वटता परत आला. फिर्यादी कुरेशी यांनी खरेदीदाराकडे पैशाची मागणी करूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे कुरेशी यांनी रविवारी एकबाल याहिया वसिम एकबाल व हाफिज एकबाल यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार उदगीर शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Looted 13 lacs to the vendor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.