फटाक्यांच्या आवाजावर प्रशासनाची नजर

By Admin | Updated: October 18, 2014 23:47 IST2014-10-18T23:47:14+5:302014-10-18T23:47:14+5:30

बीड : ठो ठो.. टु डूम डूम.. असा फटाक्यांचा आवाज कानावर पडला की, कानाचे पडदे फाटण्याची वेळ येते. मात्र फटाके वाजवणाऱ्याला कोणीही रोखू शकत नाही.

The look of the administration of crackers | फटाक्यांच्या आवाजावर प्रशासनाची नजर

फटाक्यांच्या आवाजावर प्रशासनाची नजर



बीड : ठो ठो.. टु डूम डूम.. असा फटाक्यांचा आवाज कानावर पडला की, कानाचे पडदे फाटण्याची वेळ येते. मात्र फटाके वाजवणाऱ्याला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती हा त्रास गुपचूप सहन करत आलेली आहे. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या आवाजात फटाके वाजविणाऱ्यांवर आता प्रशासनाची नजर असणार आहे, फटाके वाजवून त्रास देणाऱ्यांना चाप बसणार आहे.
दिवाळीचा सण आता अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत सर्वच सज्ज झाले आहेत. शाळा, महाविद्यालयांसह अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयांना जवळपास सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण आता दिवाळीचा आनंदात सहभागी होत आहे.कपड्यापासून ते फटाके खरेदीपर्यंतची सर्वच तयारी झाली असून काही लोक आजही फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत.
रात्री उशीरापर्यंत, रूग्णालय, गर्दीचे ठिकाण आदी ठिकाणी फटाके वाजविण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. कमी आवाजाचे फटाके वाजवून दिवाळी आनंदात साजरी करण्याचे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी सांगितले.
बीडचे पथक उदासिन
मोठ्या आवाजात फटाके वाजविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कंट्रोल बोर्ड (एमपीएसबी) यांची नजर असते. मात्र खंत एवढीच आहे की, याचे कार्यालय कोठे आहे आणि याचे काय कार्य आहे, हेच कोणाला माहित नाही. तसेच या विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने केला. या पथकाने कारवाई केली तर सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही, असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)
अ‍ॅल्युमिनियम-किडनीचा आजार व वयोवृध्द लोकांना अशक्तपणा, हाडांच्या वेदना, पचनक्रियेत अडथळा, छातीतील जळजळ, भावनिक अस्थिरता.
४सल्फर डायआॅक्साईड-हृदय, डोळे, कान, यकृत, किडनी यांना इजा.
४पोटॅशियम नायट्रेट - श्वसन मार्गावर परिणाम, पोटात दुखणे, दम लागणे, भोवळ येणे, मानसिक अवस्था,
४बेरियम- अशक्तपणा, श्वसनाला अडथळा, अतिसार, शक्ती कमी होणे, बधीरता येणे.
फटाक्यातील धुरामधून कार्बन डायआॅक्साईड, सल्फर डायआॅक्साईड, शिसे, व्हॅनाडियम, कॉपर, आयर्न, अ‍ॅल्यूमिनीअम, मॅग्नीज, झिंक यासारखे घातक वायू बाहेर पडतात.
४हे वायू पर्यावरणाबरोबरच आरोग्याला धोकादायक ठरत असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ.संजय जानवळे सांगितले़
४मोेठ्या आवाजापेक्षा कमी आवाजांच्या फटाक्यांमध्ये जास्त विषारी धातू असतात. ते बालकांच्या आरोग्याला खूप धोकादायक असतात.
४त्यापासून अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात, त्यामुळे लहान मुलांना फटाके फोडू देऊ नयेत, असा सल्ला डॉ़ जानवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़

Web Title: The look of the administration of crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.