तपामान ४३.५ अशांवर !
By Admin | Updated: April 16, 2016 00:13 IST2016-04-15T23:52:37+5:302016-04-16T00:13:07+5:30
औराद शहाजानी : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, या चालू आठवड्यातील गत चार दिवसात किमान तापमान ३ अंशाने वाढले आहे.

तपामान ४३.५ अशांवर !
उन्हाची तीव्रता : किमान तापमान पोहचले ३३ अंशावर...
औराद शहाजानी : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, या चालू आठवड्यातील गत चार दिवसात किमान तापमान ३ अंशाने वाढले आहे. औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर किमान तापमान ४३.५ अंश नोंदवले गेले आहे.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य आग ओकायला लागला आहे. गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ३ अंशापेक्षा अधिक तीव्रता या तापमानात वाढ झाली आहे. परिणामी रस्त्यावर शुकशुकाट जाणवू लागला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच रस्त्यावरची गर्दी कमी-कमी होत दुपारी १२ वाजताच रस्ते निर्मनुष्य होत आहेत. नदी आणि धरणक्षेत्र पुर्णता पावसाळ््यात कोरडेठाक पडल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आ हे. नदीकाठी सिंचन क्षेत्र घटल्यामुळे हिरवळ नाहिशी झाली नाही. वर्षानूवर्ष सावली देणारे अनेक झाडे यावर्षी पाण्याअभावी बोडकी झाली आहेत. परिणामी, उन्हाची तीव्रता आता दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतरही गरम झळा सहन कराव्या लागत आहेत. या तापमानाचा पारा आणखीन वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुलांना ताप येणे, उलटी होणे, जुलाब लागणे, त्वचा कोरडी पडणे आदीं प्रकारचे आजार होत आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारचा प्रवास टाळावा, असे वैद्यकिय अधिकारी डॉ. डी. एस. कदम यांनी सांगितले.
औराद हवामान केंद्रावरील नोंदी...
दिनांककमालकिमानबाष्पीभवन
११ एप्रिल ४१.०५३२७.०८
१२ एप्रिल४२.००३१८.००
१३ एप्रिल४२.०५३२८.०२
१४ एप्रिल४२.०५३१८.०३
१५ एप्रिल४३.०५३३८.०४