नादुरूस्त रस्ता अन् अतिक्रमणांचीही लांब रांग

By Admin | Updated: May 30, 2014 00:25 IST2014-05-29T23:47:09+5:302014-05-30T00:25:44+5:30

वाशी : येथील बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या मुख्य रस्त्यावर तसेच ग्रामपंचायतीकडे असलेल्या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

Long range of unheard road and encroachment | नादुरूस्त रस्ता अन् अतिक्रमणांचीही लांब रांग

नादुरूस्त रस्ता अन् अतिक्रमणांचीही लांब रांग

 वाशी : येथील बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या मुख्य रस्त्यावर तसेच ग्रामपंचायतीकडे असलेल्या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत असून, त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणेही केली आहेत. यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडीत होत असल्याचे पहावयास मिळत आहे. वाशी शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहराच्या मध्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता गेला असून, या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावर जुन्या बसस्थानकालगत भाजी विक्रेते व फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटून रस्ता अरूंद केला आहे. हीच अवस्था ग्रामीण रूग्णालयासमोर व पारा चौकात झाली आहे. या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने एक वर्षापूर्वी अतिक्रमणे हटवण्यासंबधी संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. तसेच लक्ष्मी रोड, बायपास रोड, पारा चौकात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी केली जातात. यामुळे शेताकडे जाणार्‍या येणार्‍या महिलांना वाट शोधत जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन अतिक्रमण हटवावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर) पार्र्किंग व्यवस्था नाही या रस्त्यावरच मुख्य बँका असून, दैनंदिन व्यवहारासाठी तालुक्यातील नागरिक येतात. मात्र, या ठिकाणी कसलीही वाहन पार्र्कींगची व्यवस्था नसल्याने या ग्राहकांच्या दुचाकी व चारचाकी बँकासमोरील रस्त्यावर उभ्या केल्या जातात. यामुळेही वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे बँक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम व पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व पादचार्‍यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.

Web Title: Long range of unheard road and encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.