लांबरवाडीत आठ, इंजेगावात तीन घरे फोडली
By Admin | Updated: December 14, 2015 23:56 IST2015-12-14T23:52:32+5:302015-12-14T23:56:46+5:30
पाटोदा/परळी : लांबरवाडी ता. पाटोदा व इंजेगाव ता.परळी येथे रविवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत अनुक्रमे ८ व ३ अशी ११ घरे फोडली. दोन्ही गावांमधून लाखोंचा ऐवज पळविला आहे.

लांबरवाडीत आठ, इंजेगावात तीन घरे फोडली
पाटोदा/परळी : लांबरवाडी ता. पाटोदा व इंजेगाव ता.परळी येथे रविवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत अनुक्रमे ८ व ३ अशी ११ घरे फोडली. दोन्ही गावांमधून लाखोंचा ऐवज पळविला आहे.
लांबरवाडी येथील बहुतांश लोक ऊसतोडीसाठी गेले आहेत. घरात कोणी नसल्याचा चोरट्यांनी त्यांची घरे निशान्यावर धरत वस्तीवरील तीन घरांचे कुलूप तोडले. घरातील पेटया, डब्बे आदी साहित्या घेऊन गेले व जवळच्या मोकळ्या परिसरात ते उघडून त्यातील सोन्या-चांदीचे साहित्य नेले. त्यानंतर त्यांनी गावातील इतर घरांकडे मोर्चा वळविला. पाच घरे फोडली. प्रकाश बळे, सुखदेव लांबरुड ,भास्कर लांबरुड, आबासाहेब लांबरुड, दादासाहेब आजबे, रघुनाथ आजबे, विठ्ठल लांबरुड, रावसाहेब लांबरुड आदींच्या घराचा समावेश आहे. चोरट्यांनी सोन्याची कर्ण फुले ,मनी,नगदी रुपये चोरुन नेले. आठ घरातून लाखोंचा ऐवज चोरीस गेला आहे. अंमळनेर ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र गुन्हा नोंद झाला नव्हता.
इंजेगावातील संतोष कराड, विनायकराव कराड, बालासाहेब कराड या तिघांच्या घरात चोरट्यांनी हात साफ केला. सोमवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन कपाटातील सोन्याचे दोन तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे मिनी गंठण, पाच ग्रामची आंगठी, चैन, कानातले असा एक लाख आकरा हजार रुपये किमतीचा एैवज ताब्यात घेतला व शेजारीच असलेल्या विनायक कराड यांच्याही खोलीतून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दागीने घेवून जवळच असलेल्या बाळासाहेब कराड यांच्या घराकडे मोर्चावळवीत तेथेही हात साफ केला. एकूण तीन लाख सतरा हजार नऊशे रुपये किमतीचा ऐवज पळवून नेल्याची तक्रार संतोष कराड यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. (वार्ताहर)