लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा केंद्र सरकारकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:04 IST2021-05-31T04:04:16+5:302021-05-31T04:04:16+5:30

डॉ. कराड यांनी सांगितले, लोकनेते मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत स्पेशल पोस्टल कव्हर अनावरण समारंभ होत आहे. या ...

Loknete Gopinath Munde honored by Central Government | लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा केंद्र सरकारकडून सन्मान

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा केंद्र सरकारकडून सन्मान

डॉ. कराड यांनी सांगितले, लोकनेते मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत स्पेशल पोस्टल कव्हर अनावरण समारंभ होत आहे. या उद्‌घाटनप्रसंगी केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह आमदार, खासदार, केंद्रीय पदाधिकारी, राज्य पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, ऑनलाईन सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व्हर्च्युअल लिंक तयार करण्यात येणार असून, इच्छुकांना त्यात सहभागी होता येईल. या कार्यक्रमाचे समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामध्ये आयोजक माजी आ. पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावरून सहभागी होणार आहेत.

पत्रकार परिषदेला आ. अतुल सावे, प्रवीण घुगे, अनिल मकरिये, राजेश मेहता, राम बुधवंत आदींची उपस्थिती होती.

Web Title: Loknete Gopinath Munde honored by Central Government