लोकनेते विलासरावांना आदरांजली

By Admin | Updated: May 27, 2017 00:32 IST2017-05-27T00:27:31+5:302017-05-27T00:32:10+5:30

लातूर : लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती ‘विकास दिन’ म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी शुक्रवारी साजरी करण्यात आली.

Lokneeta Vilasrao respected | लोकनेते विलासरावांना आदरांजली

लोकनेते विलासरावांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती ‘विकास दिन’ म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी शुक्रवारी साजरी करण्यात आली. बाभळगाव येथील ‘विलासबाग’ येथे विलासराव देशमुख यांना देशमुख कुटुंबियांसह हजारो कार्यकर्त्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहून अभिवादन केले. लोकनेत्याच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
बाभळगाव येथील विलासबागेत भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी सकाळी ९ वाजता सामूहिक प्रार्थना सभा झाली.
यावेळी आमदार दिलीपराव देशमुख, सुवर्णा देशमुख, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, दीपशिखा देशमुख, विजयाबाई देशमुख, अभिजीत देशमुख, काकासाहेब पाटील, शहाजी पाटील यांच्यासह खा.डॉ. सुनील गायकवाड, प्रदीप राठी, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजीराव राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, बसवराज पाटील नागराळकर, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, अ‍ॅड. विक्रम हिप्परकर, रमेश राठी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Lokneeta Vilasrao respected