लोकमततर्फे आज ‘राशी कवच’
By Admin | Updated: June 13, 2016 00:44 IST2016-06-13T00:32:34+5:302016-06-13T00:44:20+5:30
औरंगाबाद : कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तींच्या राशीमुळे त्यांच्यात आलेले गुणधर्म, स्वभाववैशिष्ट्ये आणि

लोकमततर्फे आज ‘राशी कवच’
औरंगाबाद : कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तींच्या राशीमुळे त्यांच्यात आलेले गुणधर्म, स्वभाववैशिष्ट्ये आणि त्यामुळे होणाऱ्या विविध गमतीजमती यावर आधारित एका धमाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योतिषाचार्य विवेक म्हेत्रे हे त्यांच्या ‘राशी कवच’ या कार्यक्रमातून राशींमुळे होणाऱ्या गमतीजमती सांगून सखींचे मनोरंजन करणार आहेत. सोमवार दि. १३ जून रोजी सायं. ४ वा. संत एकनाथ रंग मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तिन्ही काळांचा विचार करून पावले टाकत असतो.
काल केलेल्या चुका आज करायच्या नाही आणि पुढे पण होऊ द्यायच्या नाहीत असे ठरविणारी प्रत्येक व्यक्ती तिन्ही काळांचा विचार करीत असते; पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो, मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशींचा कसा प्रभाव पडतो, हेच नेमके या कार्यक्रमातून सांगण्यात येणार आहे.
सखी मंच सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राशींच्या गमतीजमती सांगणाऱ्या या धमाल कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
कलर्स चॅनल व लोकमत सखी मंच प्रस्तुत पुन्हा एकदा नवीन संकल्पना नवीन विषय घेऊन गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या भेटीला येत आहे. वेगळा विषय, वेगळी कथा, वेगळा बाज अशी कार्यक्रमाची प्रस्तुती होणार आहे. वेगवेगळे विषय हाताळून प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न नेहमीच ‘कलर्स’ चॅनलतर्फे करण्यात येतो. ‘कवच’ या कलर्स चॅनलच्या नवीन धारावाहिकमधून पारिधी आणि राजबीर या जोडप्याची कथा सांगण्यात येणार आहे.
४ एक वाईट शक्ती मंजुलिका राजबीरच्या प्रेमात पडते आणि त्याला जिंकण्यासाठी पारिधीला संमोहित करते. पारिधी मंजुलिकाच्या वाईट जादूतून बाहेर निघू शकेल का? पारिधीचे प्रेम बनू शकेल का तिचे कवच काळ्या शक्तींपासून वाचण्यासाठी? जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका, कलर्सची नवीन धारावाहिक ‘कवच’ ११ जूनपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री आठ वाजता.