लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे प्री-प्रायमरी शाळांसाठी फॅशन शो व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:30 IST2018-02-22T00:30:42+5:302018-02-22T00:30:47+5:30
लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे प्री-प्रायमरी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दि.२६ फेब्रुवारी रोजी लोकमत लॉन येथे सायंकाळी ४.३० वाजता फॅशन शो व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे प्री-प्रायमरी शाळांसाठी फॅशन शो व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबतर्फे प्री-प्रायमरी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दि.२६ फेब्रुवारी रोजी लोकमत लॉन येथे सायंकाळी ४.३० वाजता फॅशन शो व फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्युनिअर के.जी.तील चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस (थिम -स्पोर्टस् अटायर), तर सिनिअर के.जी.तील चिमुकल्यांसाठी फॅशन शो (थिम- इनक्रिडेबल इंडिया), अशा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. लहान मुलांमध्ये स्टेज डेअरिंग वाढावे हा या स्पर्धेमागील उद्देश होय.
या स्पर्धेत सहभागी होणाºया सर्व शाळांतील विद्यार्थ्यांकडून दि.२२ फेब्रुवारी सायंकाळी ४ ते ६ व दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान पूर्वतयारी करून घेण्यात येईल.
आपल्या चिमुकल्यांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रवेश खुला असून, मित्र, कुटुंब आणि शिक्षकांना आम्ही आमंत्रित करीत आहोत. स्पर्धेसाठी प्रवेश शाळेमार्फत आहे. शाळांंनी मुलांच्या नावनोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी मोबाईल नं. ७८८८०४१४५३ वर संपर्क साधावा.