‘लोकमत’च्या स्पोर्टस बुक स्पर्धेचे बक्षीस वितरण
By Admin | Updated: July 23, 2014 00:21 IST2014-07-23T00:03:45+5:302014-07-23T00:21:47+5:30
हदगाव : मनाठा येथील आदर्श विद्यालयात लोकमततर्फे आयोजित स्पोर्टस बुक स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे यांच्या हस्ते करण्यात आले़
‘लोकमत’च्या स्पोर्टस बुक स्पर्धेचे बक्षीस वितरण
हदगाव : मनाठा येथील आदर्श विद्यालयात लोकमततर्फे आयोजित स्पोर्टस बुक स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे यांच्या हस्ते करण्यात आले़ र्स्प्धेतील प्रथम बक्षीस पियानो - समृद्धी सुनीलराव पाध्ये, द्वितीय- नेहा सिद्धार्थ नरवाडे (ट्रॉली बॅग) व तृतीय बक्षीस मंगेश नामदेव सूर्यवंशी (बॅडमिंटन सेट) यांना मिळाले़ तर इतर सहभागी विद्यार्थ्यांना हमखास बक्षिसे देण्यात आली़
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मुख्याध्यापक सुहास शिंदे, उपमुख्याध्यापक के़एऩ सांडवे, प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्छे, रवी तोताडे, विलास डांगे, संजय सोंदनकर, प्रकाश मेडपलवार, वैद्य, श्रृंगारे, आडे सर, चंद्रमनी सावतकर, एजंट विजय वाठोरे, सुनील चौरे उपस्थित होते़ (वार्ताहर)