‘लोकमत संस्काराचे मोती’चे बक्षीस वितरण

By Admin | Updated: February 10, 2015 00:33 IST2015-02-10T00:16:07+5:302015-02-10T00:33:03+5:30

आमठाणा : १ जुलै ते ११ आॅक्टोबर यादरम्यान घेण्यात आलेल्या ‘लोकमत संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रज्ञाजागृती प्रा. शाळेत मोठ्या उत्साहात करण्यात आले

'Lokmat Sanskar Ki Moti' prize distribution | ‘लोकमत संस्काराचे मोती’चे बक्षीस वितरण

‘लोकमत संस्काराचे मोती’चे बक्षीस वितरण


आमठाणा : १ जुलै ते ११ आॅक्टोबर यादरम्यान घेण्यात आलेल्या ‘लोकमत संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रज्ञाजागृती प्रा. शाळेत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर, माजी जि.प. सदस्य सचिन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम बक्षीस श्रीकांत चव्हाण, द्वितीय संकेत जाधव, तर तृतीय बक्षीस ऋतुजा तायडे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. जि.प. शाळेचे शिक्षक श्याम जोशी, अशोक काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक देशमुख, ज्ञानेश्वर गवते, कुरकुटे, पुरी, पिसे,वाघमोडे, रिंढे, पगार आणि शिक्षिका राठोड, अंभोरे, साखरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: 'Lokmat Sanskar Ki Moti' prize distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.