‘लोकमत’च्या स्पर्धेमुळे वाचनाची गोडी’
By Admin | Updated: July 20, 2014 00:27 IST2014-07-20T00:15:21+5:302014-07-20T00:27:53+5:30
नवीन नांदेड : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पोर्टस बुक धमाका व संस्काराचे मोती या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची ‘गोडी’ निर्माण झाली
‘लोकमत’च्या स्पर्धेमुळे वाचनाची गोडी’
नवीन नांदेड : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पोर्टस बुक धमाका व संस्काराचे मोती या स्पर्धेमुळे वाचन संस्कृतीपासून दूर जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाचनाची ‘गोडी’ निर्माण झाली, असे मत मुख्याध्यापक के. ए. जोशी यांनी व्यक्त केले.
नवीन नांदेड परिसरातील कुसुमताई विद्यालय, इंदिरा गांधी हायस्कूल आणि शिवाजी विद्यालयातील सर्व स्पर्धकांना लोकमतच्या वतीने आयोजित स्पोर्टस बुक धमाका स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कुसुमताई विद्यालयात आयोजित बक्षीस वाटप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संभाजीराव बिरादार होते. याप्रसंगी मुख्याध्यापक के.ए. जोशी, उपमुख्याध्यापक निजाम शेख, मेरवान जाधव, विलास बिरादार, किशोर इप्पर, प्रकाश बेळकोणे व रवी राजे आदींची प्रमुख उपस्थिती होती, तर इंदिरा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. सी. देशमुख होते.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते कुसुमताई विद्यालयातील आदिती अनिल जोशी हिस प्रथम,अनुजा संजय अटकोरे हिस द्वितीय, तर अनुपम श्याम पडलवार या विजेत्या स्पर्धकांना तृतीय बक्षीस प्रदान करण्यात आले. १० जुलै रोजी इंदिरा गांधी हायस्कूलचे विजेते स्पर्धक पूजा प्रकाश कावडे हिस प्रथम, कोमल माधव दूधमल हिस द्वितीय,तर खुशी नंदकुमार सरोदे हिस तृतीय बक्षीस देण्यात आले. शिवाजी विद्यालयातील चिन्मय रवींद्र रेपेकर यास प्रथम, ऋतुजा दत्तात्रय पारसेवार हिस द्वितीय व पायल शिवाजीराव वाघमारे हिस तृतीय बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक सिंधुताई तिडके यांनी, सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक जे.ई.गुपिले यांनी केले, तर मुख्याध्यापक बी. जी. निलेवार यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी सुनील देशमुख व एस.एस. चिटमलवार यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)